Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुरूग प्रकरणात मोठा खुलासा… तरुंगात असलेला बाबा देवाचा अवतार सांगायचा, सेवेच्या नावाखाली मुलींवर करायचा अत्याचार

कर्नाटकातील चित्रदुर्ग परिसरातील लिंगायत मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुग शरनारू तुरुंगात जाताच मोठे खुलासे होऊ लागल्याने कर्नाटक राज्यासह संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.

मुरूग प्रकरणात मोठा खुलासा... तरुंगात असलेला बाबा देवाचा अवतार सांगायचा, सेवेच्या नावाखाली मुलींवर करायचा अत्याचार
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 12:47 PM

कर्नाटक : बलात्कार प्रकरणात कर्नाटकमधील लिंगायत मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुग शरनारू यांच्यासह पाच जणांना बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नुकतेच याबाबत पोलीसांनी 694 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये धक्कादायक बाबींचा उल्लेख करण्यात आला असून खळबळ उडाली आहे. खरंतर म्हैसूरमधील एका एनजीओकडून अक्का महादेवी वसतिगृहाच्या विद्यार्थिनींचं समुपदेशन सुरू होते. याच काळात काही विद्यार्थिनींने गंभीर बाबींचे कथन केले होते. यावरून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरून लिंगायत मठाच्या शिवमूर्ती शरनारू यांच्यासह पाच जणांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. जिल्हा बाल संरक्षण युनिट अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे मठाच्या वसतिगृहाच्या वॉर्डनसह एकूण पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबत धक्कादायक बाबी समोर येत असतांना पोलीसांनी जे आरोपपत्र दाखल केले आहे त्यात नमूद केलेल्या बाबीने खळबळ उडाली आहे.

कर्नाटकातील चित्रदुर्ग परिसरातील लिंगायत मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुग शरनारू तुरुंगात जाताच मोठे खुलासे होऊ लागल्याने कर्नाटक राज्यासह संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.

आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे, मुरुग मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुग शरनारू स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घेणारा साधू विद्यार्थिनींनी सेवा करण्यास नकार दिल्यास त्यांना शाप देण्याची धमकी देत ​​असे.

हे सुद्धा वाचा

कर्नाटक पोलिसांनी बाबाच्या विरोधात 694 पानांचे जे आरोपपत्र सादर केले आहे. त्यात शरनारूच्या बेडरूममध्ये ड्रग्ज, दारू आणि अंमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता.

याशिवाय अल्पवयीन मुलींना बेडरूममध्ये पाठवले होते, दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी मठाच्या प्रमुखाला 1 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुग शरनारू याने २०१३ ते २०१५ याने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आला असून धक्कादायक बाब म्हणजे फळातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करत होता.

हॉस्टेलच्या रेक्टरचा या प्रकरणात सहभाग असून विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी बाबाकडे फळं द्यायला सांगितले जायचे, त्यावेळी बाबाकडून पैसे घेऊन ये असेही सांगितले जायचे.

अटकेत असलेला बाबा मुलींना फळं, ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट्स द्यायचा. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करायचा. या प्रकरणात आणखी धक्कादायक घडल्या असून आरोपपत्रात नमूद केलेल्या आहेत.

या घटणेनंतर मुरग मठाची सूत्रे सरकार हाती घेण्याच्या तयारीत आहे. प्रशासक नेमून शिवमूर्ती मुरुग शरनारू यांना मठाच्या प्रमुखपदावरून हटविले जाण्याची शक्यता आहे, त्यासाठी अहवाल मागविण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हंटलं आहे.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.