चक्क सोफासेटमध्ये डेडबॉडी! गळा आवळून सुप्रियाची कुणी केली हत्या? डोंबिवलीत खळबळ

Dombivli Murder : सुप्रिया किशोर शिंदे असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला घरी एकटी असताना तिच्यासोबत हा प्रकार घडल्याचं कळतंय. या हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला

चक्क सोफासेटमध्ये डेडबॉडी! गळा आवळून सुप्रियाची कुणी केली हत्या? डोंबिवलीत खळबळ
डोंबिवलीत आणखी एक हत्या!
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 1:43 PM

डोंबिवली : डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. डोंबिवलीत एका महिलेचा मृतदेह चक्क सोफासेटमध्ये (Dead body in sofa set)  आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीच्या दावडी येथील शिवशक्ती नगर (Shivshakti Nagar in Dawadi, Dombiwali) परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा आवळून तिची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या महिलेच्या मृत्यूमागे नेमका कुणाचा हात आहे, याचं गूढ उकलण्याचं सध्या पोलिसांसमोर आव्हान (Police investigation) उभं ठाकलंय. सुप्रिया घरी एकटी असताना तिच्यासोबत हा प्रकार घडलाय. याप्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीनं तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासातून या महिलेची हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलंय.

कुणी लपवला मृतदेह सोफासेटमध्ये?

डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडे बारा वाजता शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. पत्नी घरात नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला. ती कुठेही आढळून आली नाही. मित्र मंडळी नातेवाईकांसह सगळीकडे विचारपूस केली होती. तरी कुठे गेली आहे हे समजून आले नाही.

याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात पोहचले होते. रात्र झाली होती. घरात दररोज येणा:या शेजा:यांना सोफा विचित्र अवस्थेत दिसून आला. त्यांनी तो सोफा चाचपला. सोफ तपासून पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला. कारण सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती.

हत्येचं कारण काय?

सीनिअर पीआय शेखर बागडे, पोलिस निरिक्षक अनिल पडवळ आणि पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुप्रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. अखेर तिची हत्या कोणी व कशा करीता केली. तिच्यासोबत काही गैर प्रकार झाला आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून विचारपूस सुरु आहे

वर्षभरापूर्वी सुटकेसमध्ये डेडबॉडी!

दरम्यान दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत एक सूटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करत एकाला अटक केली होती. शरीस संबंधास नकार दिल्यानं एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह हा सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका 27 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

Dombivali Crime : वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या, कारण अस्पष्ट, घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ

20 गुंठे जमिनीसाठी डोंबिवलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या, चुलतभाऊ झारखंडमध्ये कसा सापडला?

बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.