धक्कादायक, मुंबईत एमडी ड्रग्जची विक्री, सांगलीच्या अंमलीपदार्थांचे गुजरात आणि मुंबई कनेक्शन उघड
राज्यातील विद्येचे माहेर घर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातून मागे ललित पाटील याचे एमडी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी या एमडी ड्रग्जचे कारखाने उभे असल्याचे उघडीस आले होते. दौंड येथील करकुंभ एमआयडीसीत देखील एमडीचा कारखाना उद्धवस्त करण्यात आला होता.
![धक्कादायक, मुंबईत एमडी ड्रग्जची विक्री, सांगलीच्या अंमलीपदार्थांचे गुजरात आणि मुंबई कनेक्शन उघड धक्कादायक, मुंबईत एमडी ड्रग्जची विक्री, सांगलीच्या अंमलीपदार्थांचे गुजरात आणि मुंबई कनेक्शन उघड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/MD-DRUGS.jpg?w=1280)
सांगलीतील विटा येथे बनविण्यात येणाऱ्या एमडी ड्रग्जची मुंबईत देखील विक्री झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. सांगली पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.गुजरात, मुंबई आणि सांगली असा एमडी ड्रग्डचा त्रिकोण समोर आल्याने पोलिसांना देखील धक्का बसला आहे. सांगलीच्या पोलिसांनी हे एमडी ड्रग्जचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी तपासाचा वेग वाढविला आहे. सांगलीच्या विटा येथील माऊली कारखान्यात एमडी ड्रग्जच्या गोळ्यांची विक्री केली जात होती हे उघडकीस आले आहे.
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटा येथील माऊली नावाच्या एका कारखान्यावर छापा टाकत एमडी ड्रग्जचा मोठा अड्डा उद्धवस्त केला होता. याप्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करीत तब्बल ३० कोटींचा एमडी ड्रग्ज आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. आता हे ड्रग्ज रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी सांगली पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये एमडी ड्रग्ज बनण्याचा कारखाना विटा होता. तर एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल हा थेट गुजरात आणि मुंबईमधून विटामध्ये,कधी ट्रान्सपोर्ट तर खाजगी वाहनाने पोहोचायचा अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/ghee-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/tiger-urin.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/buldhana-hair-loss-news.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mahakumbh2025.jpg)
मुंबईत देखील विक्री
सांगलीच्या एमडी ड्रग्जचे गुजरात आणि मुंबईशी कनेक्शन असल्याचा समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे विटा येथून हे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईला जायचे,अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईमधून हे ड्रग्ज नेमके कुठे विकले जात होता ? विक्रीचा मास्टरमाईड कोण ? याच बरोबर एमडी ड्रग्ज विक्रीच्या आणि कच्च्या मालाची रसद पुरवणारे नेमके कोण आहेत. यांना शोधून काढण्यासाठी सांगली पोलिसांची तीन पथके गुजरात आणि मुंबईला रवाना झाली आहेत अशी माहिती सांगलीचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे.