Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI बँकेत गोळीबार, दहिसर शाखेतला एक कर्मचारी ठार, 2.50 लाख लुटून दोघे फरार

या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांचे पथक, डीसीपी विशाल ठाकूर यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.

SBI बँकेत गोळीबार, दहिसर शाखेतला एक कर्मचारी ठार, 2.50 लाख लुटून दोघे फरार
गोळीबार करताना दरोडेखोर
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 7:25 PM

मुंबई : दहिसर पश्चिम गुरुकुल बिल्डिंग जीएस रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India, Dahisar Branch) शाखेत लूटमार करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला. यात एक राऊंड चोरांनी फायर करुन अडीच लाख रुपये लुटले आहेत. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी (MHB) पोलिसांचे पथक (Police), डीसीपी (DCP) विशाल ठाकूर यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.

कधीची घटना?

ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. अडीच लाख रुपये यावेळी चोरट्यांनी बँकेतून लुटलेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी बँक कर्मचाऱ्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. सीसीट्वीही कॅमेऱ्यामध्ये दोघेजण कैद झाले असून एकानं सफेद रंगाचं तर दुसऱ्यानं काळ्या रंगाचं शर्ट घातलं होतं. दोघांनीही तोंडाला कपडा बांधल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे.

आज दुपारी 3.27 वाजता हे चोरटे बँकेत आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला. एक राऊंड फायरही केला. त्यानंतर बँकेतील अडीच लाख रुपये रक्कम लुटली.

दहिसर पश्चिमेला स्टेट बँक ऑफ इंडियाची एक शाखाा आहे. गुरुकुल बिल्डिंग जीएस रोडवर परिसरात असलेल्या या बँकेत गोळीबाराची ही थरारक घटना घडली. या वेळी दोघांना बँकेतून रक्कम घेऊन पळ काढला. दरम्यान, या चोरीवेळी त्यांनी केलेल्या गोळीबारामुळे आजूबाजूला असलेल्यांना पोलिसांना लगेचच याबाबत कळवलं. मात्र पोलिस दाखल होईपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता. आता या चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या मदतीनं शोध घेण्यासाठी आठ विशेष पथकं तयार केली आहेत.

इतर ताज्या बातम्या –

मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही; नारायण राणेंचे कणकवली पोलिसांना पत्रातून उत्तर

Nagpur Omicron | नागपूर हादरले! तीन ओमिक्रॉनबाधित सापडले; थर्टी फस्टच्या पार्ट्यांवर कसे येणार निर्बंध?

Italy Murder : पत्नीने सेक्स नकार दिला म्हणून पतीने चाकूने भोसकले, चारित्र्यावरही घ्यायचा संशय

पाहा व्हिडीओ –

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.