Crime News : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन पतीला संपवलं, हत्येची स्टोरी समजल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल
ज्यावेळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी सुरु केली, त्यावेळी त्याने केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली असल्याची माहिती समजली आहे. ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, त्याचं लग्न २००४ साली झालं होतं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (UP) राज्यातील कानपूर (Kanpur) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या पतीची बेदम मारहाण करुन हत्या केली आहे. ज्या व्यक्तीची हत्या करायची होती. त्या व्यक्तीला मारण्यापूर्वी प्रचंड दारु पाजली होती. त्यानंतर त्याच्या बायकोला बॉयफ्रेंडने विचारलं की, त्याची हत्या करु का ? ज्यावेळी गर्लफ्रेंडने हत्या करण्याची परवानगी दिली, त्यानंतर आरोपीने चाकूने वार केले. पोलिसांनी (crime news in marathi) या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर त्याची कसून चौकशी सुरु आहे.
ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, त्याचं नाव संजय आहे. तो मुलगा फर्रुखाबाद येथील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीचं नाव सुमन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हा आपल्या दोन मुलांसह रावतपूर येथे भाड्याच्या घरात राहत होता. सुमन एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. संजय सुध्दा कामाला तिथं कधी कधी जात होता. पोलिसांनी सांगितलं की, ज्यावेळी संजय गायब झाला त्यावेळी त्याच्या पत्नीने पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिली होती.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, संजयला पोलिस शोधत होती. त्याचवेळी पोलिसांनी सुमनच्या फोनची कॉल डिटेल्स काढली. पोलिसांना त्यामध्ये एक माहिती मिळाली की, सुमन एका व्यक्तीशी अधिक बोलत आहे. पोलिसांनी ज्यावेळी त्या तरुणाची माहिती काढली, त्यावेळी त्याचं नाव राजेश असल्याचं समजलं. राजेश सुध्दा त्याचं कंपनीत नोकरी करीत होता. त्याचबरोबर तिथल्या एका जवळच्या वस्तीत तो राहत होता.
पोलिसांनी राजेशला चौकशीसाठी ताब्यात घेतला. त्याची ज्यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली, त्यावेळी त्याने कबूली दिली. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वडिलांनी सांगितलं की, २००४ मध्ये संजयचं सुमन सोबत लग्न झालं होतं. याच्या आगोदर सुध्दा सुमनने संजयला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन आणि राजेश यांनी संजयला मारण्याचा प्लॅन एक महिना आगोदर केला होता.
संजयला राजेशने घरातून बोलावून नेलं आणि प्रचंड दारु पाजली. त्यानंतर त्याची हत्या केली. ज्यावेळी संजयची हत्या करायची होती. त्यावेळी राजेशने सुमनची परवानगी घेतली होती. ज्यावेळी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका पार्कमध्ये फेकून देण्यात आला होता.