AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Aftab : श्रद्धाची आफताबने हत्या का केली हे तर कळलं, पण कशी केली हे वाचलंत का?

श्रद्धाची हत्या करताना आफताबच्या मनात काय विचार होते? काळीज सुन्न करणारी मर्डर मिस्ट्री

Shraddha Aftab : श्रद्धाची आफताबने हत्या का केली हे तर कळलं, पण कशी केली हे वाचलंत का?
श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावालाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 15, 2022 | 12:42 PM
Share

नवी दिल्ली : मुंबईची मुलगी आणि दिल्लीचा मुलगा प्रेमात पडले. प्रेमासाठी तिने आपल्या आईवडिलांशीही नातं तोडलं. पण अखेर तिच्या प्रियकरानेच तिचा निर्घृण खून (Shraddha Aftab News) केला. हे सनसनाटी हत्याकांड (Murder Mystery) आहे श्रद्धा आणि आफताब यांच्या प्रकरणाचं. दिल्लीत (Delhi murder News) घडलेल्या मुंबईतील मुलीच्या हत्येनं अख्खा देश हादरुन गेलाय. या हत्येप्रकरणी आता मुख्य आरोपी आफताब याला पोलिसांनी अटक केलीय. या अटकेनंतर एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे समोर येऊ लागलेत.

ज्या श्रद्धाने आफताबवर जीवापाड प्रेम केलं, तिची हत्या करताना आफताबच्या मनात काय विचार होते? या हत्येचा कट त्याने किती विचारपूर्वक रचला होता, याची थरकाप उडवणारी गोष्टही आता समोर आलीय.

28 वर्षांचा आफताब पुनावाला आणि 26 वर्षांची श्रद्धा वॉकर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. श्रद्धाची हत्या करुन आफताबने तिचे तब्बल 35 तुकडे केले. या संतापजनक घटनेप्रकरणी मुख्य आरोपी आफताबपर्यंत पोहोचयला पोलिसांनी 6 महिने लागले.

प्राथमिक चौकशीत आफताब याने श्रद्धाचा गळा दाबून हत्या केल्याचं कबुल केलंय. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. ते एका पॉलिथीनच्या पिशवीत टाकले.

हे तुकडे त्याने 300 लीटरच्या एका फ्रिजमध्ये ठेवले होते. 20 ते 22 दिवस दररोज वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धाच्या शरीराचे तुकडे आफताब वेगवेगळ्या ठिकाणी टाकत होता.

रोज रात्री जंगलाच्या वेगवेगळ्या भागात जायचं आणि तिथे थोडे थोडे तुकडे टाकायचे, असा दिनक्रमच आफताबने चालवला होता. आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेयसीची हत्या आफताबने का केली, याचंही कारण आता समोर आलंय.

लिव्ह इनमध्ये आफताबसोबत राहणाऱ्या श्रद्धाने आफताबला लग्न करण्यास सांगितलं होतं. पण तो लग्न करण्यासाठी तयार नव्हता. लग्नासाठी श्रद्धाचा वाढता दबाव आफताब सहन करुन शकला नाही आणि त्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचललं.

श्रद्धाच्या हत्येनंतर तिचा मृतदेह कुजू नये म्हणून त्याने आफताबने फ्रिज घेतला. पण तरिही दुर्गंध पसरण्याची भीती होतीच. यासाठी त्याने क्राईम शो पाहून राहत्या घरात चक्क अगरबत्या पेटवून ठेवल्या होत्या.

अमेरिकेतील क्राईम शो डेक्सटरमधून प्रेरणा घेऊन त्याने हे काम केलं होतं. इतकंच नव्हे तर गुगलवर त्याने रक्ताचे डाग कसे मिटवायचे, याचा अभ्यास केला. त्यानंतर केमिकलने फरशीवर पडलेले रक्ताचे डाग त्याने पुसले. रक्ताचे डाग लागलेले कपडेही त्याने नष्ट केले.

श्रद्धाची हत्या 18 मे रोजी करण्यात आली होती, हे आता स्पष्ट झालंय. पण श्रद्धा जिवंत आहे, हे भासवण्यासाठी श्रद्धाचं सोशल मीडिया अकाऊंटही सुरु ठेवलं होतं. डेटिंग ऐपवरील तिचं अकाऊंटही त्याने सुरु ठेवलं होतं.

सप्टेंबर महिन्यात श्रद्धाच्या मैत्रिणीनं तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याशी काही संपर्क झाला नाही. अखेर श्रद्धाच्या मैत्रिणीने श्रद्धाच्या भावाला कळवलं. हा हत्याकाडांच्या खऱ्या तपासाची सुरुवात इथूनच सुरु झाली.

सगळ्यात आधी मुंबई पोलिसात श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. आता श्रद्धाच्या प्रियकराने गुन्हा कबुल केला असला तरी पोलिसासमोरचं आव्हान अजूनही कायम आहे.

अजूनही पोलिसांना आफताबने ज्या चाकूने श्रद्धाच्या शरिराचे 35 तुकडे केले, तो सापडू शकला नाहीये. तर दुसरीकडे जे तुकडे सापडले आहेत, ते देखील श्रद्धाच्याच शरीराचे आहेत का, याचा खुलासा होणंही बाकी आहे.

सोमवारी पोलिसांनी आफताबला कोर्टात हजर केलं होतं. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आफताब पुनावाला याला कोर्टासमोर हजर केलं जाईल.

आता पोलीस आफताबची कसून चौकशी करत आहेत. सोबत आफताबचा फोनमधी डेटा, सोशल मीडिया अकाऊंटवरील डेटा आणि आफताबशी संबंधित लोकांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. या हत्याकांड प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तर मिळणं, अजूनही बाकी आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.