श्रद्धा हत्याकांड प्रकरण : मुंबईतून पोलिसांच्या हाती लागली महत्त्वपूर्ण माहिती, थेट आफताबशी कनेक्शन

18 मे रोजी हत्याकांड घडल्याचा संशय, त्यानंतर बरोबर 18 दिवसांनी काय घडलं? पोलीस तपासात मोठा ब्रेक थ्रू

श्रद्धा हत्याकांड प्रकरण : मुंबईतून पोलिसांच्या हाती लागली महत्त्वपूर्ण माहिती, थेट आफताबशी कनेक्शन
आफताब;ची आजच नार्को टेस्ट?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 7:54 AM

मुंबई : वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder News) या तरुणीच्या दिल्लीत (Delhi Murder Case) झालेल्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आलीय. या हत्याकांड प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतून महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 18 मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने हत्या केल्याचा दाट संशय पोलिसांनी वर्तवलाय. त्याच पार्श्वभूमीवर तपास सुरु आहेत. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार हत्येच्या 18 दिवसांनी आफताब याने मुंबईतून दिल्लीला काही सामान मागवलं होतं. पॅकर्स आणि मूवर्स कंपनीच्या मदतीने हे सामान मागवण्यात आलं होतं, असं स्पष्ट झालंय.

दिल्ली पोलिसांनी गुडलक पॅकर्स एन्ड मुव्हर्सशी जोडले गेलेल्या गोविंद यादव यांची चौकशी केली. नयनगर पोलीस ठाण्यात दिल्ली पोलिसांच्या पथकाने ही चौकशी केली होती. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या चौकशीतून महत्त्वपूर्ण खुलासा झालाय.

श्रद्धा वालकर या तरुणीची 18 मे रोजी हत्या झाली. हत्येच्या 18 दिवसांनी म्हणजेच 5 जून रोजी आफतबाने मुंबईतून दिल्लीत काही सामान मागवलं. याची रिसीप्टही पोलिसांच्या हाती लागलीय.

एकूण 37 गोष्टी आफतबाने मुंबईतून दिल्लीत मागवल्या. वसईतून या गोष्टी मागवण्यात आल्या. रिसीप्ट वरुन एक गोष्ट झालीय. श्रद्धाच्या हत्येनंतर या गोष्टी मागवण्यात आल्या होत्या, असं पोलिसांच्या निदर्शनास आलंय.

मुव्हर्स एन्ड पॅकर्स कंपनीला ऑनलाईन बुकिंग करुन आफताबने काम दिलं होतं. गोविंद यांच्या चौकशीतून ही बाब समोर आलीय. सामान पोहोचवण्याचं काम गोविंद यांच्या सहकार्ऱ्यांनी केलं होतं. गोविंद स्वतः त्यावेळी आपल्या गावी होते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिलीय.

गोविंदने दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या सामानात घरातल्या वस्तूंचा समावेश होता. सामान शिफ्ट करुन झाल्यानंतर आफताबशी कोणतीही बातचीत न झाल्याचंही गोविंद याने म्हटलंय.

आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. तिचं शिर त्याने एका तलावात फेकलं. तर शरीराचे इतर तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात फेकले. अद्यापही श्रद्धाचं शिर पोलिसांना सापडू शकलेलं नाही.

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताबची नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. ही नार्को टेस्ट आज केली जाण्याची शक्यता आहे. आता श्रद्धाचं शिर शोधणं, ज्या हत्याराने आफताबने हे कांड केलं, ते हत्यार शोधणं आणि नार्को टेस्टमधून हत्येचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.