श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट, मृतदेहाचे 13 अवशेष-जबडाही सापडला, वाचा सविस्तर…
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील मोठी अपडेट...
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील (Shradhha Valkar Murder Case) मोठी अपडेट समोर आली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे 13 अवशेष पोलिसांना सापडले आहेत. आफताब पुनावालाने (Aftab Punawala) सांगितलेल्या ठिकाणी आत्तापर्यंत मृतदेहाची 13 अवशेष मिळालेत. शिवाय जबडाही मिळाला आहे. बाथरूम आणि किचन व्यतिरिक्त सीएफएसएलला बेडरूममधून रक्ताच्या डागांचे नमुनेही मिळाले आहेत.
दिल्ली पोलिसांनी काही शस्त्रे जप्त केली आहेत. ही शस्त्रं जंगलात आणि आफताबच्या फ्लॅटमधून मिळाली आहेत. आफताबने या शस्त्राचा वापर कसा केला? हे सीएफएसएलच्या अहवालानंतर स्पष्ट होईल.
गुरुग्राममधून देखील काही शरीराचे अवशेष मिळाले आहेत. आत्तापर्यंतच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धाला आफताबला सोडायचं होतं. त्याच्या छळामुळे ती नाराज होती.या दोघांनी 3-4 मे ला वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.
आफताबला ही गोष्ट आवडली नाही. श्रद्धा दुस-या कोणाशी तरी जोडली जाईल, असं त्याला वाटत होतं. फ्लॅट दाखवणाऱ्या बद्रीची कोणतीही भूमिका अद्यापर्यत संशयास्पद आढळलेली नाही. त्याने फक्त फ्लॅट दाखवला.
दिल्ली पोलिसांकडे एकही प्रत्यक्षदर्शी नाही, ही या प्रकरणातील सर्वात मोठी समस्या आहे.पोलिसांनी फ्लॅटमधून काही कपडे देखील जप्त केले आहेत. हे CSFL तपासासाठी पाठवले आहेत. CSFL चा अहवाल येणं बाकी आहे.
पोलिसांना संशय आहे की, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मुंबई पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा श्रद्धाचे काही अवयव फ्लॅटमध्ये असल्याचा पोलिसांना संश होता. त्याच्या तपासाला आता वेग आलाय.