लातुरात कोयत्यानं सपासप वार, नांदेडमध्ये खून करुन हाडं नदीत फेकली, 5 मित्रांनी आपल्याच मित्रांना का संपवलं?

लातुरात मित्रांनीच मित्रावर कोयत्यानं सपासप वार केले होते. तर नांदेडमध्ये तर मित्राची हत्या केल्यानंतर त्याची हाडं नदीत फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लातुरात कोयत्यानं सपासप वार, नांदेडमध्ये खून करुन हाडं नदीत फेकली, 5 मित्रांनी आपल्याच मित्रांना का संपवलं?
नांदेडमध्ये पाच मित्रांनी मिळून केली मित्राचीच हत्या
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 9:56 AM

नांदेड : लातुरात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची सपासप वार करुन हत्या करण्यात आली. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालेली असतानाच आता नांदेडमध्येही अशाच प्रकारे आणखी एक हत्याकांड घडलं आहे. लातुरातील (Latur Student Murder) हत्येप्रकरणी पाच मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. तर नांदेडमध्येही (Nanded Murder) पाच मित्रांनी मिळून आपल्याच मित्राला संपवलं आहे. मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. लातूरपाठोपाठ नांदेडमध्ये झालेल्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  21 वर्षीय सुनील सुलगेकर हा गेल्या महिनाभरापासून गायब होता. त्याचा शोध घेत असताना हत्येचा थरारक प्रकार उघड झालाय. पाच आरोपींनी मिळून 18 डिसेंबर रोजी सुनीलची हत्या करत त्याला जाळून टाकले. या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघेजण हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

हत्या करुन हाडं नदीत फेकली

लातुरात मित्रांनीच मित्रावर कोयत्यानं सपासप वार केले होते. तर नांदेडमध्ये तर मित्राची हत्या केल्यानंतर त्याची हाडं नदीत फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच जणांनी मिळून मित्राचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून हाडे नदीत फेकण्यात आली असल्यचं समोल आलंय. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मयत तरुण गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याची हत्या करण्यात आल्याचं कळल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय.

बारावीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

लातुर शहरात रविवारी एका युवकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. विशाल नगर भागातल्या साई मंदिराजवळ धारदार हत्यारांनी वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. रोहन उजळंबे (18) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन हा लातुरच्या दयानंद कॉमर्स महाविद्यालयात 12 वी मध्ये शिकत होता. रविवारी सकाळी 11.30 वाजल्यानंतर रोहन उजळंबे हा साई मंदिर परिसरात आला होता. इथे त्याच्यावर अज्ञात युवकाने धारदार हत्यारांनी हल्ला केला. जखमी झालेल्या रोहनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

लातुरात झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच मित्रांना अटक केली आहे. लातुरात हत्येनंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तर नांदेडमध्येही पाच मित्रांनी मिळूनच हत्याकांड केल्याचा संशय व्यक्त केला जात असून पाचही जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. नेमकं दोन्ही हत्यांमधील कारण कळू शकलेलं नसलं, तरिही पाच मित्रांनी एकत्र येऊन ही हत्या केल्यानं सगळेच हादरुन गेले आहे. या हत्याकांडप्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान सध्या लातूर आणि नांदेड पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

संबंधित बातम्या :

लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला, मित्र म्हणाले नाटक करतोय; वाचा पुढे नेमकं काय घडलं?

शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल

नवजात बाळांना विकणारी टोळी अखेर गजाआड, 2.75 लाखात बाळाची विक्री, काय होती मोड्स ओपरेंडी?

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.