प्रेमविवाह केला म्हणून…! सांगलीत सैराटची पुनरावृत्ती, आधी मुलीच्या वडिलांनी धमकावलं, योगेशला अज्ञातांनी भोसकलं

Sairat in Sangli : योगेशच्या मित्रांनी त्याला लगेचच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. म्हणून योगेशचा जीव थोडक्यात वाचलाय. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

प्रेमविवाह केला म्हणून...! सांगलीत सैराटची पुनरावृत्ती, आधी मुलीच्या वडिलांनी धमकावलं, योगेशला अज्ञातांनी भोसकलं
सांगलीत सैराटची पुनरावृत्ती, योगेश लवाटेवर जीवघेणा हल्ला
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 8:27 PM

सांगली : सैराट सिनेमा (Sairat Marathi Movie) येऊन आता काही वर्ष लोटली आहे. पण सैराट सिनेमात दाखवल्याप्रमाणे घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती काही थांबायचं नाव घेत नाही आहे. अजूनही राज्याच्या वेगवेगळ्या भागात सैराट सारख्या घटना घडतच असल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये (Miraj, Sangli) धक्कादायक घडना घडली असून प्रेमविवाह केल्याचा रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात तरुण जखमी (Newly married young boy stabbed by unknown attackers) झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीअसून याप्रकरणी आता दोघा संशयितांना ताब्यातही घेण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी तरुणाच्या नातलगांनी पोलिसांत या हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलंय. याप्रकरणी आता अधिक तपास सांगली पोलिसांकडून केला जातो आहे.

नेमकं काय घडलं?

सांगलीच्या मिरजेतील सुभाष नगर बारगाले प्लॉट याठिकाणी प्रेम विवाह केल्याच्या रागातून योगेश चंद्रकांत लवाटे या 28 वर्षांच्या तरुणावर गुरुवारी हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाला होता. गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरुन येत योगेशवर धारदार शस्त्रानं वार केले. यानंतर दोघाही हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

यानंतर योगेशच्या मित्रांनी त्याला लगेचच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. म्हणून योगेशचा जीव थोडक्यात वाचलाय. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, योगेशच्या काकीनं पोलिसांत या हल्ल्याबाबत तक्रार दिली. त्यानंतर दोघा संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

चिंता वाढली!

योगेश लवाटे याने दीड महिन्यांपूर्वी भडकंबे आष्टा येथील तरुणीशी प्रेम विवाह केला होता. दोन दिवसांपूर्वी दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये जोरदार वाद झाला होता. दोन्ही कुटुंबात झालेला वाद मिरज पोलिसांतही पोहचला होता. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशनमध्येच मुलीच्या वडिलांनी योगेश याला धमकी दिली होती. यानंतर आता गुरुवारी योगेशवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सैराट सारखी घटना सांगलीत घडल्यानं चर्चांना उधाणही आलंय. एकूणच राज्यातील वाढत्या सैराट सारख्या घटनांची पुनरावृत्ती चिंतेचा विषय बनू लागली आहे.

संबंधित बातम्या :

सांगलीत आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत, नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचांविरुद्ध गुन्हे दाखल

मुंबईत धक्कादायक घटना! सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण वाचून हादराल

संभाजीराजेंनी सांगितलेला शाहू-होळकर कुटुंबात झालेला विवाह सोहळा तुम्हाला माहित आहे का?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.