वहिनीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले, मग तरुणासोबत घडले ‘हे’ भयंकर कृत्य

दिराने वहिनीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले. दिराकडून ही बाब कुणाला कळेल या भीतीने वहिनीने प्रियकराच्या मदतीने जे केले ते पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

वहिनीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले, मग तरुणासोबत घडले 'हे' भयंकर कृत्य
वहिनीने प्रियकराच्या मदतीने दिराला संपवले
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 12:04 PM

करनाल : अनैतिक संबंधातून एक भयंकर घटना हरयाणात घडली आहे. वहिनीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्याने दिराची हत्या केल्याची घटना हरयाणातील करनालमध्ये घडली आहे. आपल्या अनैतिक संबंधाबद्दल कुणाला सांगेल या भीतीपोटी वहिनीने प्रियकराच्या मदतीने दिराचा काटा काढला. याप्रकरणी पोलिसांनी वहिनी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. तमन्न आणि रोहित अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. घटना उघड होताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. आजम खान असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

लग्नानंतर शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध जुळले

तमन्नाचा विवाह करनालमधील शेखपुरा गावातील गफ्फार खानसोबत सहा वर्षापूर्वी झाला होता. दोघांना एक मुलगाही आहे. लग्नानंतर तमन्नची शेजारी राहणाऱ्या रोहितशी मैत्री झाली. मग मैत्रीचे अनैतिक संबंधात रुपांतर झाले. बकरी ईदच्या आदल्या दिवशी घरी कुणी नसल्याची संधी साधत तमन्नाने रोहितला घरी बोलावले. दोघेही आक्षेपार्ह स्थितीत असताना अचानक तमन्नाचा दिर आजम घरी आला. त्याने दोघांना रंगेहाथ पकडले.

भेटण्याच्या बहाण्याने तलावाजवळ बोलावले आणि हत्या केली

आजमने कुणाला याबाबत सांगू नये म्हणून तमन्न आणि रोहितने त्याला खूप विनवण्या केल्या. तरीही कधी ना कधी आजम सर्वांना याबाबत सांगेल या भीतीने दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार रोहितने त्याला भेटण्याच्या बहाण्याने तलावाजवळ बोलावले. मग त्याची हत्या करुन मृतदेह तलावात टाकला. दुसऱ्या पाण्यावर मृतदेह तरंगताना पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी कुटुंबीयांचीही चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांना तमन्नावर संशय आल्याने तिची कसून चौकशी केली असता सर्व घटना उघड झाली. यानंतर कुटुंबीयांना धक्काच बसला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.