Kalyan Crime : सख्ख्या बहिणी पक्क्या चोर, दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात यायच्या अन् चोरी करायच्या !

कल्याणमध्ये सोन्याच्या दुकानातून चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेष म्हणजे यात महिलांचा चोरांचा सुळसुळाट आहे.

Kalyan Crime : सख्ख्या बहिणी पक्क्या चोर, दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात यायच्या अन् चोरी करायच्या !
कल्याणमध्ये चोरट्या बहिणींना बेड्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 7:47 AM

कल्याण / 4 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट झाला आहे. दागिने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात घुसून दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी नणंद-भावजयीच्या जोडीला चोरी प्रकरणी अटक केल्यानंतर आज सख्ख्या बहिणींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महात्मा फुले पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली आहे. सदर आरोपी महिला उल्हासनगरमधील रहिवासी आहेत. निशा अशोक पुनवानी आणि रेश्मा अशोक पुनवानी अशी अटक महिलांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करुन पसार झाल्या

कल्याण पश्चिमेतील नारायणवाडी परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात दोघी बहिणी खरेदीच्या बहाण्याने घुसल्या. दागिने पाहण्याचा बहाणा करत दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दोघी बहिणींनी सोन्याची अंगठी हातचलाखीने चोरुन दुकानातून पोबारा केला. काही वेळाने दुकानदाराच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपी महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल पुढील तपास सुरु केला.

सीसीटीव्हीच्या आधारे सापळा रचून आरोपींना अटक

दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलांचा शोध सुरु केला. आरोपींचा कसून शोध घेत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर कँप 5 परिसरातून सापळा रचून अटक केली. आरोपींकडून चोरी केलेल्या अंगठ्या हस्तगत केल्या आहेत. पोलीस चौकशीत आरोपी बहिणींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.