दारूसाठी भाऊ बनला वैरी ! पत्नीसोबत मिळून मोठ्या भावाला एवढं मारलं की ….
दारू आणि गांजाच्या अवैध व्यवसायाला विरोध केल्यामुळे लहान भावाने पत्नीसह मिळून मोठ्या भावाला बेदम मारहाण केली.
कलकत्ता : लहान भाऊ अवैध दारू (aclohol) आणि गांजाचा व्यवसाय करत होता. मोठ्या भावाने त्याला विरोध केला. यामुळे चिडलेल्या लहान भावाने आणि त्याच्या पत्नीने मोठ्या भावाला (small brother beats big brother) बेदम मारहाण केली. त्यातच मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोलकात्याजवळील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बागुआती जवळील गावात हा प्रकार घडला आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेपासून आरोपी भाऊ फरार आहे. त्याच्या पत्नीला बागुआती पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक तेथे पोहोचले. त्यांनी कुटुंबाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बागुआतीच्या आदर्शपल्लीत अनेक दिवसांपासून दारू आणि गांजाचा अवैध धंदा सुरू होता. राजू मंडल हा इसम तेथे गांजाचा व्यवसाय करायचा. राजू हा परिसरात विविध ठिकाणी काउंटरवर बेकायदेशीरपणे गांजाचा पुरवठा करतो. मात्र त्याच्या या धंद्याला, त्याचा मोठा भाऊ रॉबिन मंडल याने विरोध केला होता.
कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री या दोन भावांमधील वाद शिगेला पोहोचला. मोठ्य भावाच्या विरोधामुळे चिडलेल्या राजूने रॉबिनला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रॉबिन मंडल यांना बागुआती येथील देशबंधू नगर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाइकांनी बागुआती पोलिस ठाण्यात हत्येची फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी इसमाची पत्नी पौर्णिमा मंडल हिला अटक केली आहे. तर आरोपी राजू मंडल हा फरार आहे.
दारू आणि गांजाच्या धंद्याला विरोध केल्याने गमावला जीव
मृत इसम रॉबिनची याच्या सुनेने सांगितले की, ‘माझ्या सासऱ्यांना हृदयाचा त्रास आहे. ते बराच काळ अंथरुणावर होते. त्यादिवशी इतके भांडण झाले की ते आणखीनच आजारी पडले. मात्र तरीही त्यांच्या लहान भावाने तेथे येऊन सासऱ्यांना एवढी मारहाण केली की त्यांचा मृत्यू झाला.’ घटनेची माहिती मिळताच बिधाननगर येथील प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक प्रसेनजीत नागे तेथे पोहोचले. या परिसरात बऱ्याच दिवसांपासून गांजाचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार त्यांनी केली.
रॉबिनने गांजाच्या व्यवसायाला विरोध दर्शवला होता. मात्र हा धंदा करणारा त्याचा छोटा भाऊच होता, त्याने मोठ्या भावाल जबर मारहाण केली. आणि तो फरार झाला. नगरसेविकेच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी राजू मंडल याचा शोध सुरू केला आहे.
मृत रॉबिन यांची पत्नी अर्चना मंडल म्हणाल्या, ‘ माझा दीर आणि त्याची बायको या दोघांनी दारू पिऊन काल दिवसभर गोंधळ घातला. त्यानंतर आमच्या घरावर विटा फेकण्यात आल्या. मग मी कौन्सिलरला बोलावून ते काय करत आहेत ते दाखवले. नगरसेवक येताच ‘आता आम्ही हे करणार नाही’, असे त्यांनी सांगितले. मात्र नगरसेवकाची पाठ वळताच त्यांनी पुन्हा विटांचा वर्षाव सुरू केला. मी माझ्या नवऱ्याचा हात खेचला, जाऊ नकोस, पण जेव्हा त्याने पुढे जाऊन दार उघडले तेव्हा त्याच्या डोक्यावर वीट मारली आणि नंतर त्याला मारहाण केली. हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले.