Solapur Crime : रात्री वॉकसाठी घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत, सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा थेट मृतदेहच सापडला !

सुट्टीनिमित्त गावी आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहमीप्रमाणे रात्री जेवणानंतर वॉकला गेले. मात्र त्यानंतर कधीच परतले नाहीत.

Solapur Crime : रात्री वॉकसाठी घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत, सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा थेट मृतदेहच सापडला !
मयत एपीआय सूरज चंदनशिवेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 10:29 AM

सोलापूर / 3 ऑगस्ट 2023 : सोलापुरातील सांगोला तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रात्री जेवणानंतर वॉकसाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. सूरज विष्णु चंदनशिवे असे हत्या झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. चंदनशिवे यांची कुणी आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत चंदनशिवे सांगली शहर पोलीस दलात कार्यरत होते. सुट्टीनिमित्त मूळगावी आले होते. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

जेवणानंतर वॉकसाठी गेले ते परतलेच नाहीत

मयत सूरज चंदनशिवे हे रात्री जेवून झाल्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास वॉकसाठी गेले. यावेळी उसाच्या शेतात आधीच दबा धरुन बसलेल्या अज्ञात इसमांनी त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात चंदनशिवे यांचा जागीच मृ्तयू झाला. बराच वेळ झाला तरी चंदनशिवे घरी परतले नाहीत. घरच्यांनी त्यांना फोन लावला तर बंद येत होता. घरच्यांना काहीच थांगपत्ता लागत नव्हता.

पहाटे रस्त्यालगत मृतदेह सापडला

आज पहाटेच्या सुमारास सांगोला-वासूद रस्त्याच्या लगत चंदनशिवे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून सखोल तपास सुरु

चंदनशिवे सांगली शहर पोलीस दलात कार्यरत होते. सुट्टीनिमित्त ते आपल्या मूळगावी सांगोला तालुक्यातील वासूद येथे आले होते. चंदनशिवे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली?, कुणी केली? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.