AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार पुरुष आणि एक महिला गाडीतून उतरले, मंदिराजवळ बाळाला सोडून सगळे पसार

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावरील बावी येथील मंदिरात ही घटना घडली. सोमवारी सकाळी आठ ते दहा दिवसांचे पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

चार पुरुष आणि एक महिला गाडीतून उतरले, मंदिराजवळ बाळाला सोडून सगळे पसार
सोलापुरात मंदिराजवळ बाळ सापडले
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 2:36 PM
Share

सोलापूर : सोलापुरातील सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ लहान बाळ बेवारस अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारमधून आलेल्या चार पुरुष आणि एका महिलेने बाळ मंदिराजवळ सोडून पोबारा केला. आठ ते दहा दिवसांचे पुरुष जातीचे हे नवजात अर्भक आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावरील बावी येथील मंदिरात ही घटना घडली. आज (सोमवार) सकाळी आठ ते दहा दिवसांचे पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे.

नेमकं काय घडलं?

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बावी येथील सिद्धेश्वरच्या मंदिराजवळ एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली होती. या गाडीतून चार पुरुष आणि एक महिला हातात लहान बाळाला घेऊन उतरले. मंदिरात जाऊन ते लहान बाळ तिथेच सोडून, आलेल्या गाडीतून कुर्डूवाडीच्या दिशेने ते घाई गडबडीने निघून गेले. स्थानिक नागरिक येईपर्यंत ते पसार झाले होते.

बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात

या घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील यांना देऊन त्या लहान बाळाला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना परिसरात समजताच तर्कवितर्क चर्चांना उधाण आले आहे. तर या घटनेने “माता न तू वैरीणी’ अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात बाळाला झुडपात सोडणारी आई अटकेत

गेल्या वर्षी पुण्यातील चांदणी चौकातील झुडपात चार महिन्यांच्या बाळाला सोडून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र या पाषाणहृदयी आईला कोथरुड पोलिसांनी अवघ्या काही तासात अटकही केली होती. महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली होती. अंगात फुल बाह्यांचा निळा शर्ट, त्यावर एक पांढरा शर्ट, गुलाबी फुल पँट, पायात मोजे, थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अंगावर पांघरलेली निळी शाल असे सर्व तऱ्हेने सुरक्षित असलेले चार महिन्याचे बाळ एका झुडपाखाली ठेवले होते.

संबंधित बातम्या 

चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत

(Solapur Baby Boy found near Siddheshwar Temple)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.