Solapur Murder : उकळतं तेल टाकून शेतकऱ्याला मारणारी दुसरं तिसरं कुणी नव्हे तर पत्नीच! हत्येचा असा बनाव रचला की,…

Solapur murder : पत्नीने पतीचा अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हे कृत्य केले असल्याची कबुली दिली आहे.

Solapur Murder : उकळतं तेल टाकून शेतकऱ्याला मारणारी दुसरं तिसरं कुणी नव्हे तर पत्नीच! हत्येचा असा बनाव रचला की,...
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 2:11 PM

सोलापूर : उकळतं तेल अंगावर टाकून शेतकऱ्याचा खून केल्याची घटना माढा (Madha, Solapur murder news) तालुक्यातील सापटणे गावात घडली होती. मात्र या हत्याकांडाला आता नवं वळण लागलंय. टेभुर्णी पोलिसांच्या (Solapur murder case) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्याच्या पत्नीला अटक केली. या शेतकऱ्याची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर पत्नीनेच पतीच्या (Wife killed husband) अंगावर उखळते तेल टाकून केली होती. वनिता शहाजी ढवळे असं पतीची हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आबे. टेंभुर्णी पोलिसांनी या घटनेचा छडा चारच दिवसात लावला असून खऱ्या गुन्हेगाराला ताब्यातही घेतलंय. पत्नी-पतीमध्ये घरात चारित्र्यावरुन संशयाचे वातावरण होते. दोघांना ही एकमेकांवर संशय होता. संशयाच्या नजरेतूनच हे टोकाचे पाऊल पत्नीनं उचललंय. पतीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध होते, असा दाट संशय पत्नी वनिता यांना होता. यातून घरात मारहाण, शाब्दिक चकमक देखील दोघांची उडायची. त्यातूनच हे हत्याकांड घडलंय.

6 जूनला मध्यरात्री 1 च्या सुमारास शहाजी ढवळे यांचा उकळते तेल ओतून खून करण्यात आला होता. मृत ढवळे यांनी मृत्यूपूर्व जबाबात संतोष राजेंद्र ढवळे, नरसिंह राजेंद्र ढवळे यांची नावे घेतली होती. दोघांवर जमिनीच्या वादातून खून केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यातही घेतलं होतं. मात्र टेंभुर्णी पोलिसांना घटनेबाब संशय होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली गेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलिस उपनिरीक्षक धनाजी ओमासे यांनी पत्नी वनिता ढवळे यांना पोलिस ठाण्यात आणलं आणि त्यांची कसून चौकशी सुरु केली.

यानंतर गावातून आणि प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करुन माहिती काढली. अखेर या सगळ्यातून सत्य बाहेर आलं. खऱ्या गुन्हेगारा पर्यत पोहचल्याबद्दल टेभुर्णी पोलिसांचे जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

हे सुद्धा वाचा

अन् असा केला पत्नीने बनाव

शहाजी ढवळे घरात झोपले असता वनिता ढवळे यांनी पाणी गरम करुन त्यात मसाला टाकलं आणि पतीच्या अंगावर ओतून पळ काढला. काही वेळाने वनिता या माघारी घराकडे आल्या आणी कोणीतरी अज्ञात व्यक्ती गरम तेल टाकून पळून गेला ओ, असं म्हणत आरडाओरड करीत बनाव केला. या प्रकरणात महिलेसोबत आणखी साथीदार असण्याची शक्यता पोलिसांना आहे. त्यानुसार तपास सुरु आहे.

नवर्‍याने पत्नीला मारण्यासाठी आणले होते तेल;मात्र डाव पलटला

मी बाहेर अनैतिक संबंध ठेवतो म्हणून तुझ्या अंगावर गरम तेल टाकून तूला मारुन टाकतो, अशी धमकी शहाजी ढवळे यांनी पत्नी वनिता यांना दिली होती. मात्र पती झोपी गेल्यानंतर पत्नीनेचं पाणी गरम करून नवर्‍याच्या अंगावर टाकून पळून गेली. पती-पत्नी या दोघांचेही एकमेकावर बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय होते. यातून रागाच्या भरात पत्नीने पतीचा जीव घेतला.

दरम्यान, पत्नीने पतीचा अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हे कृत्य केले असल्याची कबुली दिली आहे. 15 जूनपर्यंत आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा कोर्टाने दिले आहेत.चारच दिवसात खऱ्या आरोपी पर्यंत पोहचता आले. तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे यांनी याबाबतची माहिती दिलीय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.