Video : हात पाठीमागे बांधून दोघा मजुरांना अमानुष मारहाण! सोलापूरच्या माढा तालुक्यातील धक्कादायक घटना, व्हिडीओही समोर

Solapur Madha Crime News : कामाचे पैसे घ्यायला या, असं म्हणत दोघा मजुरांना बोलावण्यात आलं होतं. कामाचे पैसे घेण्यासाठी आलेल्या मजुरांना चौघांनी मिळून मारहाण केली. एका पत्र्याच्या खोलीत चौघे जण दोघा मजुरांना मारहाण करत असल्याचं दिसून आलंय.

Video : हात पाठीमागे बांधून दोघा मजुरांना अमानुष मारहाण! सोलापूरच्या माढा तालुक्यातील धक्कादायक घटना, व्हिडीओही समोर
दोघा मजुरांना क्रूर मारहाणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 6:51 AM

सोलापूर : सोलापूरच्या माढा तालुक्यातून धक्कादायक (Solapur Crime News) घटना समोर आली आहे. दोघा मजुरांना अमानुष मारहाण (Labour beaten) करण्यात आली आहे. या मारहाणीत दोघा मजुरांचे हात पाठीमागून बांधण्यात आलेत. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी, केस ओढून, कानशिलात लगावत, दोघा मजुरांना शिविगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही धक्कादायक प्रकार माढा तालुक्यामधील भुताष्टे गावातील असून याप्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओ (Madha Crime Video) मारहाणीची अमानुष घटना किती क्रूर होती, हे कैद झालंय. या प्रकरणी चौघांविरोधात अॅट्रोसिटी, मारहाण आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून माढ पोलीस या घटनेप्रकरणी पुझील तपास करत आहेत. दरम्यान, मारहाणाची हा व्हिडीओ समोर आल्यानंतर माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसंच मजुरांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय.

हे सुद्धा वाचा

का केली मारहाण?

कामाचे पैसे घ्यायला या, असं म्हणत दोघा मजुरांना बोलावण्यात आलं होतं. कामाचे पैसे घेण्यासाठी आलेल्या मजुरांना चौघांनी मिळून मारहाण केली. एका पत्र्याच्या खोलीत चौघे जण दोघा मजुरांना मारहाण करत असल्याचं दिसून आलंय. मारहाण करण्याआधी या दोघांचाही अमानुष शारिरीक छळही करण्यात आला. केस ओढणं, कानशिलात लगावणं, दोघांचे हात पांढऱ्या दोरीने बांधून मजुरांना बंदी बनवणं, असा क्रूर प्रकार चौघांनी यावेळी केलाय.

मारहाण करण्यात आलेले दोघे मजूर भुताष्टे गावामध्ये लाईट पोलचे मुकादम असलेल्या बालाजी मोरे यांच्याकडे काम करत होते. मारहाण करण्यात आलेल्या मजुरांची नावं विकास नाईकवाडे आणि श्री. कसबे असून दे दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे काम करत होते. कामाचे पैसे घेण्यासाठी या, असं म्हणत त्यांना बोलवण्यात आलं होतं. या दोघा मजुरांना बालाजी मोरे, भालचंद्र अनंज यादव यांच्यासह एकूण चौघा जणांनी जबर मारहाण केलीय. मारहाणीचा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

शिविगाळ करत मारहाण करतानाहा हा संतापजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या घटनेप्रकरणी अॅट्रोसिटीचाही गुन्हा नोंदवून घेतलाय. तसंच मारहाण करणं आणि अपहार केल्याचाही गुन्हा चौघांवर दाखल करुन घेता आहे. आता या चौघांना नेमकी मारहाण का करण्यात आली होती, त्यांची नेमकी चूक काय होती, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. पोलिसांच्या चौकशीतून या प्रश्नांची काय उत्तरं समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचंय. तसंच अमानुष मारहाण करणाऱ्यांविरोधात नेमकी काय कारवाई होते, हेही लवकरच स्पष्ट होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.