उन्हाळ्यात मुख्य दार उघडं ठेवून झोपताय? चोरांनी मोबाईल-टीव्हीसह घर धुवून नेलं

बरेच जण घराचा दरवाजा उघडा ठेवून घराबाहेरही झोपी जातात. मात्र चोरांसाठी ही आयती संधी असल्याचं अनेकांच्या ध्यानीमनीही येत नाही (Solapur Crime Thieves House)

उन्हाळ्यात मुख्य दार उघडं ठेवून झोपताय? चोरांनी मोबाईल-टीव्हीसह घर धुवून नेलं
सोलापुरात उघड्या दारातून घरात शिरुन चोरी
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 11:17 AM

सोलापूर : उन्हाळ्यात घराचं दार सताड उघडं ठेवून बाहेर झोपणाऱ्या व्यक्तींना सावध करणारी बातमी आहे. सोलापुरात चोरांनी चक्क मोबाईल-टीव्हीसह घर धुवून नेलं. चोरीचा माल विकून आरोप चक्क स्मशानभूमी परिसरात गांजा पित बसला होता. (Solapur Crime Thieves enter House as owner slept outside during hot summer nights)

सध्या उन्हाळा असल्यामुळे घरात अनेक जणांना गरम होतं. वाढत्या उष्णतेमुळे उकडा होत असल्याने कोणी गच्चीत झोपण्याचा पर्याय निवडतं. तर बरेच जण घराचा दरवाजा उघडा ठेवून घराबाहेरही झोपी जातात. मात्र चोरांसाठी ही आयती संधी असल्याचं अनेकांच्या ध्यानीमनीही येत नाही.

सापळा रचून चोवीस तासांत आरोपी अटक

सोलापुरातील विजापूर रोड परिसरात घरमालक बाहेर झोपी गेल्यानंतर चोरी झाल्याची घटना घडली. मात्र पोलिसांनी सापळा रचून चोवीस तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या विजापूर नाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मोबाईल, टीव्ही, मिक्सर चोरीला

विजापूर रोड येथे राहणारे शरणकुमार कणकी हे उन्हाळा असल्याने घरासमोरील गेट बंद करुन घराच्या बाहेर झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. घरातील मोबाईल, टीव्ही, मिक्सर आणि इतर भांडी असा जवळपास चाळीस हजाराचा ऐवज चोरुन नेला होता.

स्मशानभूमी परिसरात गांजा पिताना अटक

याबाबतची फिर्याद त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत या चोरीचा तपास लावला आहे. पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरु केली, त्यावेळी यातील एक आरोपी स्मशानभूमी परिसरात गांजा पित बसला होता. त्याला त्यावेळी पकडल्यानंतर त्याच्या खिशात चोरीचा मोबाईल सापडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या सर्व वस्तू हस्तगत केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

हाय प्रोफाईल लोकांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न, वकिलाच्या घरात शिरताच रंगेहाथ बेड्या

Video: दूध चोरीसाठी पुण्यात भलताच फंडा, रिक्षातून येणाऱ्या चोरट्याकडून साडे पाचशे लिटर दूध लंपास

(Solapur Crime Thieves enter House as owner slept outside during hot summer nights)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.