सोलापुरात मौजमजेसाठी दुचाकी चोरी, 10 दुचाकींसह दोन अल्पवयीन मुलं ताब्यात

सोलापूर शहरात मौजमजा करण्यासाठी मोटारसायकल चालवण्याचा आनंद लुटण्यासाठी मोटारसायकली चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोलापुरात मौजमजेसाठी दुचाकी चोरी, 10 दुचाकींसह दोन अल्पवयीन मुलं ताब्यात
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 1:56 PM

सोलापूर : सोलापूर शहरात मौजमजा करण्यासाठी मोटारसायकल चालवण्याचा आनंद लुटण्यासाठी (Solapur Minor Bike Thieves) मोटारसायकल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन मुलांकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 10 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत (Solapur Minor Bike Thieves).

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. वाढत्या मोटरसायकलच्या चोरीच्या घटनांच्या तपासासाठी पोलिसांचे वेगळे पथक कामाला लावलं. दरम्यान, पोलिसांना तपासणी दरम्यान काही मोटारसायकल बेवारस स्थितीत आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाकडे विचारणा केली. तेव्हा त्याने त्याच्या मित्रासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

या दोन्ही विधीसंघर्ष मुलांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे गाड्या चालवण्याचा आनंद घेण्यासाठी दोन्ही मुले गाड्या चोरत होते, अशी कबुली त्यांनी दिली.

या मुलांचा एक मित्र गॅरेजमध्ये काम करत असल्यामुळे त्याच्याकडून त्यांनी बनावट चावी तयार करुन घेतली. त्या बनावट चावीच्या आधारे हे चोर गाडी सुरु करायचे आणि गाडी चोरुन न्यायचे. गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर ते तिथेच गाडी सोडून दोन-तीन दिवसांनी दुसरी गाडी चोरत होते. या विधीसंघर्ष मुलांकडून दहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकलच एकूण किंमत 2 लाख 10 हजार रुपये असल्याची माहिती आहे.

सध्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Solapur Minor Bike Thieves

संबंधित बातम्या :

Rekha Jare Murder | बाळ बोठेचा शोध आता परराज्यात घेणार? पोलिसांचा न्यायालयात अर्ज

भाजीविक्रीच्या नावाने परिसराची रेकी, नंतर चोरी, सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्याला बेड्या

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.