बाईकवर टेम्पो घातला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोलापुरात शिवसैनिकाची हत्या

बाईकवर डबल सीट जाणाऱ्या शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा सोलापुरात मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाच्या जवळ ही घटना घडली

बाईकवर टेम्पो घातला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोलापुरात शिवसैनिकाची हत्या
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 11:50 AM

सोलापूर : नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. बाईकने जाणाऱ्या दोघा शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. या प्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.

बाईकवर डबल सीट जाणाऱ्या शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाच्या जवळ ही घटना घडली. सतीश नारायण क्षीरसागर असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. तर दुचाकीवरील विजय सरवदे जखमी झाले आहेत.

चौघांना अटक

या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी टेम्पो चालक भैय्या अस्वले याला पोलिसांकडून अटक झाली आहे.

बोगस मतदार नोंदणीच्या तक्रारीचा राग

चार महिन्यांपूर्वी सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थ नगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर आणि विजय सरवदे या दोघांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणी केली होती. त्यानंतर बोगस नावे कमी करण्यात आली होती.

याशिवाय, रमाई आवास योजनेच्या 28 मंजूर गायब फाईलींबाबतही शिवसेनेच्या या दोघा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन संशयित आरोपीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं

डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने वार, अमरावतीत शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

रायगडमध्ये राजकीय पूर्ववैमनस्यातून शिवसैनिकाची हत्या

(Solapur Nagar Parishad NCP workers allegedly killed Shivsainik Shivsena volunteer)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.