AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईचा लग्नाला नकार, सोलापुरात तरुणाकडून आत्तेबहिणीचा गळा आवळून खून

सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाला आईने नकार दिल्याच्या रागातून तरुणाने मुलीचा गळा आवळून खून केला आहे.

आईचा लग्नाला नकार, सोलापुरात तरुणाकडून आत्तेबहिणीचा गळा आवळून खून
| Updated on: Feb 11, 2021 | 1:19 PM
Share

सोलापूर : सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाला आईने नकार दिल्याच्या (Youth Murder Girl) रागातून तरुणाने मुलीचा गळा आवळून खून केला आहे. ज्योतिबा अशोक गायकवाड असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे (Youth Murder Girl).

ज्योतिबा अशोक गायकवाड या एकवीस वर्षीय तरुणाने आपल्याच आतेबहिणीची हत्या केली. सोलापूर शहर एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर सुनfता कुसेकर असं आतेबहिणीचं नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन नगर परिसरात राहणाऱ्या सुनिता लक्ष्मण कुसेकर ही 18 वर्षीय तरुणी शिकवणीला जाते म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर सुनिता घरी परतलीच नाही. दरम्यान, इकडे सुनिता शिकवणीला बाहेर पडल्यानंतर आरोपी ज्योतिबा याने मोटारसायकलवरुन येऊन तिचा गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

तीन महिन्यांपूर्वी ज्योतिबा गायकवाड याने मृत सुनिता कुसेकरच्या आईकडे जाऊन लग्नासाठी मागणी घातली होती. तेव्हा सुनिताच्या आईने मुलगी अजून शिक्षण घेत आहे. आताच लग्नाचा विचार नाही, असे सांगत लग्नास नकार दिला होता. याचाच राग मनात धरुन ज्योतिबाने तरुणीचा गळा आवळून खून केला (Youth Murder Girl).

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करुन त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने ज्योतिबाला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Youth Murder Girl

संबंधित बातम्या :

इथे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त, तिथे रणबीर-करीनाचा आत्तेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड

चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या, पोलिसांनी शिताफीने आरोपींना पकडलं

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.