सासरवाडीतले लोक पत्नीला नांदवायला पाठवत नव्हते, रागाच्या भरात जावयाने सासऱ्यालाच संपवले !

सासरी वारंवार होत असलेल्या घरगुती वादाला कंटाळून गेल्या सहा महिन्यांपासून तेजश्री ही आपल्या माहेरी राहत आहे. तिने घटस्फोटासाठी जत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

सासरवाडीतले लोक पत्नीला नांदवायला पाठवत नव्हते, रागाच्या भरात जावयाने सासऱ्यालाच संपवले !
सांगतील जावयाने सासऱ्याला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 5:54 PM

सांगली : बायकोला नांदवायला पाठवत नाही म्हणून संतापलेल्या जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या जत तालुक्यातील दरीबडची येथे घडला आहे. आप्पासो मल्लाड असे हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी जावयासह चौघा जणांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सासऱ्याची हत्या केल्यानंतर जावई फरार झाला आहे. सचिन बिल्लोळे असे हत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. जत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

जत तालुक्यातल्या दरीबडची येथील आप्पासो पाटील यांची मुलगी तेजश्री हिचा दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील एगळी गावातल्या सचिन बिल्लोळे याच्याशी विवाह झाला होता.

मात्र सासरी वारंवार होत असलेल्या घरगुती वादाला कंटाळून गेल्या सहा महिन्यांपासून तेजश्री ही आपल्या माहेरी राहत आहे. तिने घटस्फोटासाठी जत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान घटस्फोट देण्यास नकार देत पत्नीला नांदायला पाठवा, अशी मागणी सचिन बिल्लोळे याने वारंवार माहेरच्या मंडळींकडे केली होती. यामध्ये सासरे आप्पासो मल्लाड हे आपल्या बायकोला नांदायला पाठवत नाही, असा समज जावई सचिन बिल्लोळे याच्या मनामध्ये निर्माण झाला होता.

याच रागातून रात्रीच्या सुमारास सचिन बिल्लोळे हा आपला भाऊ मिलन बिल्लोळे आणि अन्य दोघांच्यासह दरीबडची या ठिकाणी दाखल झाला. यावेळी उसाच्या शेतामध्ये काम करत असलेले सासरे आप्पासो मल्लाड यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.

सासऱ्यांची हत्या केल्यानंतर आरोपी जावई फरार झाला. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये सासऱ्याच्या हत्ये प्रकरणी जावयासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.