पैशासाठी पोटच्या मुलानेच बापाला संपवले, एक चूक नडली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

पैशासाठी माणसाला रक्ताच्या नात्यांचाही विसर पडतो. माणसं कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. जन्मदात्यांचाही विसर पडतो.

पैशासाठी पोटच्या मुलानेच बापाला संपवले, एक चूक नडली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला !
पैशांसाठी मुलाने बापाला संपवले
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 6:10 PM

बुलंदशहर : पैशासाठी माणसं कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. पैशापुढे रक्ताच्या नात्यांचाही विसर पडतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये घडली आहे. पैशासाठी मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद क्षेत्रातील सुरजावली गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजकुमार उर्फ राजू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी मुलाला दारुचे व्यतसन होते. मृतेदहाच्या शरीरावरील दातांच्या निशाणीवरुन पोलिसांनी आरोपीला पकडले. घटना उघड होताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पैशासाठी वडिलांना संपवले

वडिल 1 लाख रुपये देत नव्हते, म्हणून राजकुमारने त्यांची हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृतेदहाच्या शरीरावर चावण्याचे निशाण होते. पोलिसांनी त्याचे फोटो काढून गुजरातच्या प्रयोगशाळेत पाठवले. दाताचे निशाण पाहून पोलिसांना कुटुंबीयांवर संश आला. पोलिसांनी कुटुंबीयांच्या दातांचे निशाण तपासणीसाठी पाठवले. तपासणीत मयताच्या मोठ्या मुलाच्या दाताचे निशाण असल्याचे निष्पन्न झाले.

दाताच्या निशाणवरुन आरोपीला अटक

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने सर्व घटना सांगितली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मयत पित्याचे कपडे, डायरी आणि बँकेचे पासबुक जप्त केले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मयत पिता आरोपी राजूवर सर्वाधिक प्रेम करायचे. पण त्यानेच वडिलांचा काटा काढला.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.