Mumbai Crime : भरधाव वेगाने येणाऱ्या कारची स्कूटीला जोरदार धडक, जखमी दांपत्याला रस्त्यावरच सोडून चालक फरार
रविवारी रात्री हा अपघात घडला असून तीन दिवसानंतरही पोलिसांना त्या कार ड्रायव्हरचा अद्याप शोध घेता आलेला नाही.
मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : रात्रभर जागं असलेलं हे शहर, अशी मुंबईची ख्याती. मात्र याच शहरात राहणाऱ्या मेथ्रिन दांपत्यासाठी रविवारची रात्र खरंच खूप कठीण होती. एका समारंभात हजेरी लावून परत येणाऱ्या मॅन्युएल मेथ्रिन आणि त्याची 38 वर्षीय पत्नी सलोमी हिच्यासाठी ती रात्र धक्कादायक होती. भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या स्कूटीला (car hit scooty) एवढी जोरदार धडक (accident) दिली, की ते दोघेही धाडकन खाली कोसळले. पण तो कारचालक तेथून लागलीच फरार झाला. आणि आपल्या गंभीर जखमी झालेल्या पतीला वाचवण्यासाठी सलोमी मदतीची याचना करत राहिली.
रविवारी रात्री डॉ.ॲनी बेझंट रोड येथे हा अपघात घडला. मेथ्रिन दांपत्य हे वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवासी असून रात्री 9.30 च्या सुमारास ते एका फंक्शनवरून परत येत होते. तेव्हाच डॉ. ॲनी बेझंट रोडवरील ग्लोकल बार अँड रेस्टॉरंटजवळ एक कार बरधाव वेगाने आली आणि यू-टर्न घेत असताना कारने मेथ्रीन यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या घटनेत स्कूटीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मात्र भरधाव वेगात गाडी चालवणारा कार चालक न थांबता घटनास्थळावरून पळून गेला.
पोलिस घेत आहेत आरोपीचा शोध
या अपघाताचे सीसीटीव्ही फूटज पोलिसांनी मिळवले आहे, रविवारी रात्री हा अपघात घडला. या घटनेला तीन दिवस उलटले मात्र तरीही कारचालकाचा माग काढण्यात पोलिसांना अद्याप यश मिळालेले नाही. ज्या कारने धडक दिली, तिचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असून ड्रायव्हरचा शोध घेण्याचे कसून प्रयत्न होत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
मालाडमधील एका कंपनीत आयटी एक्झिक्युटिव्ह असलेल्या मेथ्रीनला अनेक फ्रॅक्चर्स झाली आहेत. सध्या त्याला आग्रीपाडा येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याचे मेडिकल बिल 4 लाख रुपयांपर्यंत येऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. तर त्याची पत्नी, लोमी ही देखील एक आयटी प्रोफेशनल तिला थोडंफार लागलं आहे. ‘ संपूर्ण आठवडाभर काम केल्यानंतर रविवारी बाहेर जायचा आमचा काहीच प्लान नव्हता, पण दुपारी आम्ही मुंबई सेंट्रल येथे असलेल्या एका फंक्शनला जायचं ठरवलं,’ असं सलोमीने सांगितलं.
रस्त्यावर मदत मागत होते, पण कोणीच आलं नाही
सलोमच्या सांगण्यानुसार, अपघात झाला ती जागा जागा निर्जन होती आणि कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. ‘ मी कशीबशी उठले आणि टॅक्सी शोधू लागले. अखेर एक टॅक्सीवाला थांबला,मी त्याच्या मदतीने मॅन्युएल याला उचलून टॅक्सी बसवले आणि लगेच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर मॅन्युएलचा पाय जराही हलत नव्हता, काही प्रतिसादच मिळत नव्हता. अखेक काही टेस्ट्स आणि एक्स- रे काढल्यानंतर त्यांचा संपूर्ण पाय फ्रॅक्चर झाला असून, गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणे हा एकच उपाय आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे’ सलोमीने नमूद केले.
अखेर दाखल केली FIR
डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर, सोमवारी संध्याकाळी त्यांनी वरळी पोलिसांशी संपर्क साधला आणि अज्ञात कार चालकाविरुद्ध एफआयआर ( first information report -FIR) नोंदवली असून, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.