Hingoli : मोफत धान्य देण्याचं अमिष, बाजूला नेत तोंडावर मारला स्प्रे, मग…
मोबाईलमध्ये अनेकदा आपण स्प्रे च्या माध्यमातून बेशुध्द कसे केले जाते हे आपण पाहतो. परंतु कालची घटना हिंगोली परिसरात घडल्यामुळे पोलिस सुध्दा भांबावले आहेत. आरोपीने नेमका कोणता स्प्रे मारला याची देखील चौकशी सुरु आहे.

हिंगोली – हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात भीतीचे वातावरण असल्याची माहिती समजली आहे. एका अज्ञात इ्समाने फुकट धान्य देतो असे सांगून तोंडावर स्प्रे (spray) मारला. त्यानंतर महिलेकडील सोन्याचे दागिने आणि रक्कम घेऊन पोबारा केल्याची तक्रार पोलिसांच्याकडे दाखल झाली आहे. ही घटना हिंगोली शहरातील मोंढा परिसरात घडली आहे. पोलिस (Hingoli police) आरोपीचा सीसीटिव्हीच्या साहाय्याने शोध घेत आहेत. पण या घटनमुळे शहरात घबराहट पसरली आहे.
पोलिसांच्या तक्रारीनुसार, हिंगोली शहरातील मोंढा परिसरात एका महिलेला मोफत धान्य मिळवून देण्याचे अमिष दाखवून बाजूला नेत तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केले. त्यानंतर अंगावरील दागिने व रोख रक्कम असा एकूण 96 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपीने पोबारा केला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईलमध्ये अनेकदा आपण स्प्रे च्या माध्यमातून बेशुध्द कसे केले जाते हे आपण पाहतो. परंतु कालची घटना हिंगोली परिसरात घडल्यामुळे पोलिस सुध्दा भांबावले आहेत. आरोपीने नेमका कोणता स्प्रे मारला याची देखील चौकशी सुरु आहे. परिसरात सीसीटिव्ही असल्यामुळे आरोपीचा शोध नक्की लागेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
