इंदापुरातून चोरीला गेलेले 29 फ्रीज परभणीत सापडले

रांजणगाव पुणे येथील कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी सदरचा रजिस्ट्रेशन असलेला माल इंदापूर येथील चोरीस गेल्याची माहिती दिली. | Fridge crime

इंदापुरातून चोरीला गेलेले 29 फ्रीज परभणीत सापडले
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना भालेराव कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद वस्तू ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला.
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 8:37 AM

परभणी: इंदापूर येथून चोरीस गेलेले 29 फ्रीज़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी येथील वसमत रस्त्यावरील भालेराव कॉम्पलेक्समधून जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना भालेराव कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद वस्तू ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांना 29 फ्रीज (Fridge) आढळून आले. (Stolen fridge found in Parbhani)

याप्रकरणी पोलिसांनी भालेराव कॉम्पलेक्सच्या मालकांकडे चौकशी केली. त्यावेळी भेंडेकर नामक व्यक्तीस रुम भाड्याने दिली असल्याची माहिती समोर दिली. रूमची पाहणी केली असता त्यात वर्लपुल कंपनीचे 29 फ्रिज आढळले. याबाबत रांजणगाव पुणे येथील कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी सदरचा रजिस्ट्रेशन असलेला माल इंदापूर येथील चोरीस गेल्याची माहिती दिली. तसेच याबाबत इंदापूर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद असल्याचेही म्हटले. दरम्यान, येथील सर्व फ्रीज जप्त करण्यात आले असून नवामोंढा पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची चर्चा

परभणीत झालेल्या या कारवाईची जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना सकाळी कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद वस्तू लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आलेवार, गुलाब बाचेवाड, नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे, शेख मोबीन, हरिचंद्र खूपसे, सानप, शेख अझर, मुरकुटे, निळे, राठोड, जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांना भालेराव कॉम्प्लेक्सवर छापा टाकला.

अहमदनगरमध्ये दरोडा अन् बीडमध्ये सोन्याची विक्री, दरोडेखोरास बेड्या

भरदिवसा दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लूटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलंय. अहमदनगरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून आतापर्यंत दोघांना बीड जिल्ह्यातील शिरुरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. भगवान भोसले आणि रामा इंगळे असे दोन्ही आरोपींची नावं आहेत. दरोडे टाकल्याचे भगवान भोसले याने कबूल केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, चोरीचे प्रकार वाढले होते. लुटीच्या वाढत्या प्रकरणांमुळे जिल्ह्यातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे अहमदनगरचे पोलीस मागील कित्येक दिवसांपासून चोरांच्या शोधात होते. या पार्श्वभूमीवर त्यानंतर भागवान भोसले याने दरोडा टाकून नुकतंच तब्बल 25 तोळे सोने पळवल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली. त्यांनतर सापळा रचत पोलिसांनी आरोपी भगवान भोसले याला बीडमधून अटक केले. यावेळी त्याच्याकडे तब्बल 25 तोळे सोने सापडले. तसेच त्याच्याकडून 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

इतर बातम्या :

पत्नीने पोलिसात तक्रार केल्याचा राग, नागपुरात वडिलांकडून चिमुकलीची हत्या

समलैंगिक संबंधातून क्षुल्लक वाद, पुण्यात मित्राने मित्राला संपवलं

रडणाऱ्या चिमुकलीसाठी आईने पाच रुपये मागितले, बापाने दरवाजावर आपटल्याने मुलीचा मृत्यू

(Stolen fridge found in Parbhani)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.