Asaduddin owaisi | AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या घरावर हल्ला, कोणाचा हात?

Asaduddin owaisi | असदुद्दीन ओवैसी यांच्या घरावर हल्ल्यामागे कोण आहे?. फोन झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. दरवाजाच्या काचा फुटलेल्या होत्या.

Asaduddin owaisi | AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या घरावर हल्ला, कोणाचा हात?
Attack on Asaduddin owaisi home
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 1:06 PM

नवी दिल्ली : AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या घरावर दगडफेक झाल्याच वृत्त आहे. राजधानी दिल्लीत अशोका रोडवरील असदुद्दीन ओवैसी यांच्या सरकारी बंगल्यात रविवारी फुटलेल्या काचा मिळाल्या. त्यानंतर घराच्या केअरटेकरने पोलिसांना फोन करुन तक्रार नोंदवली. आता पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितानुसार, रविवारी दुपारी 3.30 वाजता असदुद्दीन ओवैसींच्या सरकारी बंगल्यातून पोलीस ठाण्यात फोन आला.

घराचे दरवाजे तुटलेले आहेत, तिथे दगड पडलेले आहेत, अशी तक्रार करण्यात आली. फोन झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. दरवाजाच्या काचा फुटलेल्या होत्या.

असदुद्दीन ओवैसी त्यावेळी कुठे होते?

सरकारी घरात ज्या भागात तोडफोड झालीय, तो भाग कॉर्डन ऑफ करण्यात आलाय. असदुद्दीन ओवैसींच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी आता ओवैसींच्या घराबाहेर पीसीआर उभी केलीय. ही घटना घडली, त्यावेळी असदुद्दीन ओवैसी आपल्या दिल्लीतील घरी नव्हते. याआधी सुद्धा असं घडलय

असदुद्दीन ओवैसी हैदराबादमधून खासदार आहेत. याआधी सुद्धा त्यांच्या घरावर दगडफेक झालीय. त्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ओवैसीने या बद्दल टि्वटही केलं होतं. 2014 नंतर अशा प्रकारच्या चार घटना झाल्या आहेत. असदुद्दीन ओवैसी सतत चर्चेत असतात. अलीकडेच संसदेत मान्सून सत्र सुद्धा संपलं. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.