Suicide : नेवाळीत 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

मित्रांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हालवलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Suicide : नेवाळीत 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
शेतकरी आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 6:43 PM

अंबरनाथ : राज्यात दररोज गुन्हेगारी स्वरूपात घटना समोर येत असतात. कुठे खून तर कुठे मारहान तर कुठे आत्महत्या झाल्याचे समोर येत असते. त्यामुळे पोलिसांपुढे त्या गुन्ह्यांचे किंवा आत्महत्येचे गुढ उघडण्याचे आवाहन असते. उल्हासनगरातील अल्पवयीन मुलीची दोन वर्षांनी पश्चिम बंगालमधून सुटका पोलिसांनी केल्यानंतर तेथे आनंदाचे वातावरण तयार झाले होते. मात्र अंबरनाथमध्ये (Ambernath) दुख:द घटना घडल्याचे समोर आले आहे. अंबरनाथच्या नेवाळी (Newali) गावात एका 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे उघड झाली असून आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. तर सर्वेश मरगज असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी (Hill line Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरवाजा तोडत सर्वेशला बाहेर काढलं

याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेवाळी गावातील गणपती मंदिराच्या मागे सर्वेश मरगज हा तरुण एकटाच राहत होता. मंगळवारी सकाळपासून त्याचे नातेवाईक आणि मित्रांचा त्याच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळं रात्री त्याच्या मित्रांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी सर्वेश हा घरात गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा तोडत सर्वेशला बाहेर काढलं.

अकस्मात मृत्यूची नोंद

यादरम्यान त्याला वाचविण्यासाठी मित्रांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हालवलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, सर्वेश याने आत्महत्या नेमकी का केली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

इतर बातम्या :

Ahmednagar Murder : शुल्लक कारणात झालेल्या भांडणातून एका युवकाचा खून

Ulhasnagar Police : उल्हासनगरातील अल्पवयीन मुलीची दोन वर्षांनी पश्चिम बंगालमधून झाली सुटका; पळवून नेणाऱ्याला पोलिसांकडून अटक

Ganesh Naik : गणेश नाईक यांना आज दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीनावर अंतिम सुनावणी उद्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.