अखेर पोलीस अधिक्षक सचिन पाटलांची बदली, पाटलांच्या बदली नंतर कुणाची होणार ऑर्डर?

येत्या काळात शहाजी उमप की आणखी दुसरे कोणी अधिकाऱ्यांची नियुक्ती होते याकडे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरीक लक्ष ठेवून आहे.

अखेर पोलीस अधिक्षक सचिन पाटलांची बदली, पाटलांच्या बदली नंतर कुणाची होणार ऑर्डर?
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 10:20 PM

नाशिक : राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या ( IPS transfer order) बदल्या शिंदे सरकारने (Shinde Goverment) बदल्या केल्या आहेत. त्यात नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची यामध्ये बदली करण्यात आली आहे. सचिन पाटील हे आता औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन पाटील यांची 2021 च्या सप्टेंबरमध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली होती, त्यानंतर सचिन पाटील यांच्या बदली विरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या, स्वतः सचिन पाटील यांनी मॅट कोर्टात दाद मागितली होती. त्यावेळी शहाजी उमप यांची नाशिकच्या पोलीस अधिक्षक पदीचे नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर सचिन पाटील यांचा कार्यकाल पूर्ण होत असतांना मॅट कोर्टाने शहाजी उमप यांना तात्काळ नियुक्ती द्यावी असे आदेश दिले होते. त्यामुळे सचिन पाटील यांची बदली अटळ मानली जात होती. त्यानुसार आज करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये सचिन पाटील यांच्या बदलीचा समावेश आहे. मात्र, शहाजी उमप यांच्या बदलीचा किंवा नियुक्तीचा समावेश नसल्याने नाशिकच्या पोलीस अधीक्षक पदी कोण ? अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे.

नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाच्या अधिक्षक पदी कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा असतांना अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

शहाजी उमप यांची बदली ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली असल्याने शहाजी उमप यांच्या नावाचा उल्लेख शिंदे सरकारने टाळला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

सचिन पाटील यांच्या बदलीच्या विरोधात सप्टेंबर 2021 मध्ये नाशिकचे शेतकरी देखील रस्त्यावर उतरले होते, त्यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी अनेक फलक देखील झळकले होते.

नाशिकच्या ग्रामीण भागातील शेतकरी यांना व्यापाऱ्यापासून होणाऱ्या फसवणुकीचा त्रास कमी झाला होता, पाटील यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापऱ्यांना चांगलाच दणका दिला होता.

त्यामुळे ग्रामीण पोलीस दलाच्या अधिक्षक पदी कुणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता नाशिकची ग्रामीण भागातील नागरिकांना लागलेली आहे.

दिवाळीच्या दरम्यान आणखी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा असल्याने त्यात यादीत नाशिकच्या पोलीस दलाच्या अधिक्षक पदाच्या नावाचा समावेश होईल अशी अपेक्षा नाशिककरांना लागून आहे.

त्यामुळे येत्या काळात शहाजी उमप की आणखी दुसरे कोणी अधिकाऱ्यांची नियुक्ती होते याकडे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरीक लक्ष ठेवून आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.