सुसाट रिक्षा ट्रेलरमध्ये घुसली , ड्रायव्हरची फिल्मी स्टाईल उडी, विचित्र अपघातातून चालक वाचला का?
रात्रीच्यावेळेस रिक्षा सुसाट निघाली होती, रिक्षा इतकी सुसाट होती की, रिक्षा चालकाचे स्वत: वरील कंट्रोल हरवून बसला. त्याला गाडी कंट्रोल होणार नाही याचा अंदाज आला होता. तेवढ्यात त्याला अचानक समोर ट्रेलर दिसला. ट्रेलरचं स्पीड कमी असल्याचं समजतंय.
मुंबई – मुंबईत (mumbai) रात्री उशिरा सुसाट रिक्षा (rickshaw) चालकाने एका ट्रेलरला जाऊन धडकला रिक्षावरचा ताबा सुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांने प्रसंगावधान साधत रिक्षातून बाहेर फिल्मी स्टाईल उडी घेतली. त्यामुळे तो झालेल्या दुर्घटनेमध्ये बचावला कारण अनेकदा अशा अपघातमध्ये जीवितहाणी होण्याची शक्यता अधिक असते. पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात काल रात्री मुंबईतल्या बिकेसी कुर्ला (BKC kurla) कॉम्पलेक्स परिसरात झाला आहे. त्यावेळी रिक्षात कोणताही प्रवासी नव्हता नाहीतर त्याला सुध्दा मोठी जखम झाली असती असे तिथल्या स्थानिक पोलिस म्हणतात. रिक्षाचा स्पीड इतका होता, की रिक्षा थेट ट्रेलरमध्ये घुसली आहे. ही घटना इतकी विचित्र आहे, की पोलिसांनी तात्काळ रिक्षा चालकाला आणि ट्रेलर चालकाला ताब्यात घेतलं असून दोघांची कसून चौकशी करणार असल्याचे समजतंय.
दोषींवर कारवाई होणार
अनेकदा मुंबईत झोपेच्या अवस्थेत, ब्रेक फेल झाल्यावर किंवा मद्यधुंद अवस्थेत चालक असल्यावर अशा घटना घडत असतात. त्यामुळे बिकेसी पोलिसांनी दोन्ही चालकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या गाड्यांची कागदपत्रे व्यवस्थित आहेत याची तपासणी केली जाईल, त्यानंतर दोघांकडे गाड्या चालवण्याचा परवाणा आहे का ? याची सुध्दा चौकशी केली जाईल. त्यामुळे जो दोषी सापडेल त्यावर पोलिस कारवाई करतील. अपघाताच्या घडना घडू नये यासाठी महाराष्ट्र पोलिस किंवा मुंबई पोलिसांच्याकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पंरतु सध्या झालेल्या अपघाताची चौकशी झाल्यानंतर हा अपघात नेमका कशामुळे झाला हे सुध्दा स्पष्ट होईल. रात्रीच्यावेळी अनेकदा रस्त्यावर गाड्या नसल्याने स्पीडने गाड्या चालवल्या जातात. विचित्र अपघातात डाईव्हर बचावला आहे.
कसा घडला अपघात
रात्रीच्यावेळेस रिक्षा सुसाट निघाली होती, रिक्षा इतकी सुसाट होती की, रिक्षा चालकाचे स्वत: वरील कंट्रोल हरवून बसला. त्याला गाडी कंट्रोल होणार नाही याचा अंदाज आला होता. तेवढ्यात त्याला अचानक समोर ट्रेलर दिसला. ट्रेलरचं स्पीड कमी असल्याचं समजतंय. ट्रेलरमध्ये घुसणार याची भणक लागल्याने रिक्षा चालकाने तात्काळ रिक्षामधून रस्त्यावर उ़डी घेतली, आणि त्याची रिक्षा सरळ जाऊन ट्रेलरमध्ये घुसली. घुसल्यानंतर तिथल्या पोलिसांना तात्काळ ही माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर बीकेसी पोलिसांनी तात्काळ वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन दोन्ही गाड्या एका साईडला घेतल्या. तसेच रिक्षा चालकाच्या डाईव्हरला देखील ताब्यात घेतलं असल्याचं समतंय. इतका भयानक अपघात झाल्याने रिक्षा चालकाची पोलिस अधिक चौकशी करतील असं वाटतंय.