Sunanda Pushkar | थरुर, तरार आणि थरार! पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत ट्विटरवॉरच्या दुसऱ्याच दिवशी झालेला सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू

पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत (Mehr Tarar) ट्विटरवॉर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुनंदा पुष्कर यांचा झालेला गूढ मृत्यू भुवया उंचावणारा होता. तरार आपल्या पतीला ट्विटरवर स्टॉक (stalk) म्हणजेच पाळत ठेवत असल्याचा आरोप पुष्कर यांनी केला होता.

Sunanda Pushkar | थरुर, तरार आणि थरार! पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत ट्विटरवॉरच्या दुसऱ्याच दिवशी झालेला सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू
सुनंदा पुष्कर (डावीकडे), पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि शशी थरुर-सुनंदा पुष्कर
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 9:57 AM

मुंबई : माजी भारतीय डिप्लोमॅट आणि काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्या पत्नी- प्रसिद्ध उद्योजिका सुनंदा पुष्कर (Sunanda Pushkar) यांचा मृत्यू हे अजूनही एक गूढ मानले जाते. दिल्लीच्या लीला पॅलेसमधील हॉटेल रुममध्ये 17 जानेवारी 2014 रोजी त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. आपली पत्नी झोपली असावी, असा समज करुन शशी थरुर यांनी दुर्लक्ष केले. मात्र बराच वेळ त्यांना जाग आली नाही, तेव्हा त्यांना आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं समजल्याचा दावा केला जातो. सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली, की घातपात हा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास केला. सुनंदा पुष्कर यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख होता. मात्र ड्रग्ज ओव्हरडोसनंतर पुष्कर यांचा मृत्यू झाला असला, तरी त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत (Mehr Tarar) ट्विटरवॉर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुनंदा पुष्कर यांचा झालेला गूढ मृत्यू भुवया उंचावणारा होता. तरार आपल्या पतीला ट्विटरवर स्टॉक (stalk) म्हणजेच पाळत ठेवत असल्याचा आरोप पुष्कर यांनी केला होता.

कोण होत्या सुनंदा पुष्कर?

सुनंदा पुष्कर यांचा जन्म 27 जून 1964 रोजी काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. लेफ्टनंट कर्नल पुष्कर नाथ दास आणि जया दास यांच्या त्या कन्या. हॉटेल मॅनेजमेंट केलेला मित्र संजय रैनासोबत त्यांचा विवाह झाला होता. मात्र 1988 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पुढच्याच वर्षी त्या दुबईला गेल्या. 1991 मध्ये त्यांनी सुजित मेनन यांच्याशी लग्न केलं. नोव्हेंबर 1992 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. मात्र 1997 मध्ये मेनन यांचा अपघाती मृत्यू झाला.

शशी थरुरशी तिसरा विवाह

दुसरीकडे, शशी थरुरही 2007 मध्ये कॅनडियन बायको ख्रिस्ता गिल्ससोबत दुबईला आले होते. ऑक्टोबर 2009 मध्ये सुनंदा आणि शशी यांची एका पार्टीत ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2010 मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले. दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर होतं. थरुर यांच्या केरळातील गावी मल्ल्याळी पद्धतीने ते लग्नबद्ध झाले. हा दोघांचाही तिसरा विवाह होता. त्याच वर्षी शशी थरुर संसदेवर निवडून गेले.

ट्विटर वॉर

15 जानेवारी 2014 रोजी शशी थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवर पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिने कथितरीत्या पाठवलेल्या खासगी मेसेजेसची मालिका शेअर करण्यात आली होती. या मेसेजमध्ये तरारच्या मनात थरुर यांच्याविषयी असलेले प्रेम दिसून येत होते. तरारने तिचे खाते हॅक झाल्याचे सांगून घटनेकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनंदा पुष्कर यांनी दावा केला, की तरारचे खाते हॅक झाले नसून तिने आपल्या पतीवर पाळत ठेवली असावी, हे उघड करण्यासाठीच आपण ते मेसेज ट्विटरवर पोस्ट केले. त्यांनी मेहरवर आयएसआयची एजंट असल्याचाही आरोप केला होता.

नंतर, सुनंदा पुष्कर यांनी सांगितले की, आपल्याला विशेषतः निवडणुकीच्या वर्षात या प्रकरणाबद्दल सार्वजनिकपणे भाष्य करायचे नाही. दुसऱ्याच दिवशी, शशी थरूर यांच्या फेसबुक पेजवर “सुनंदा आणि शशी थरूर यांचे संयुक्त वक्तव्य” अशी एक नोट प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये असे म्हटले होते, आम्ही आनंदाने विवाहबद्ध आहोत. सुनंदा पुष्कर आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्या विश्रांती घेत होत्या. सुनंदा यांच्यावर ल्यूपस एरिथेमॅटोससचा उपचार केला जात होता, हा एक प्राणघातक विकार आहे.

त्या दिवशी नेमकं काय झालं?

17 जानेवारी 2014 रोजी, म्हणजेच सुनंदा पुष्कर आणि मेहर तरार यांच्यातील सार्वजनिक ट्विटर वादाच्या दोनच दिवसांनंतर, सुनंदा पुष्कर नवी दिल्लीच्या चाणक्यपुरीतील लीला पॅलेस हॉटेलच्या खोली क्रमांक 345 मध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. थरुर दाम्पत्य त्यांच्या घराचे नूतनीकरण आणि रंगरंगोटीचे काम सुरु असल्याने या हॉटेलमध्ये राहायला गेले होते. सुनंदा जेव्हा संध्याकाळी उशिरापर्यंत झोपेतून उठल्या नाहीत, तेव्हा थरुर यांना त्यांचा मृत्यू झाल्याची जाणीव झाली, असा दावा केला जातो. त्यांनी दिल्ली पोलिसांना माहिती दिली. हॉटेलमधून त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. त्यांच्या पार्थिवावर दक्षिण दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मृत्यू

सुरुवातीच्या अहवालांनुसार, सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. नंतरच्या अहवालात असे म्हटले गेले की त्यांच्या मृत्यूचे कारण अनैसर्गिक होते; ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या डॉक्टरांनी प्राथमिक शवविच्छेदन अहवाल दिला, ज्यामध्ये सुनंदा यांच्या शरीरावर जखमेच्या खुणा दिसून आल्या. अहवालात म्हटले होते, की या जखमा मृत्यूचे कारण असू शकतात किंवा नसूही शकतात. शवविच्छेदनाने सूचित केले की त्यांचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळे (ड्रग्ज ओव्हरडोस) झाला असावा, बहुधा सिडेटिव्ह्स, इतर औषधे आणि कदाचित अल्कोहोल यांचे एकत्रिकरण झाल्यामुळे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी विषबाधेचे कारण तपासण्याचे आणि ती हत्या आहे की आत्महत्या हे तपासण्याचे आदेश दिले.

1 जुलै 2014 रोजी, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दावा केला की त्यांच्यावर या प्रकरणात खोटा अहवाल देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता. 10 ऑक्टोबर 2014 रोजी या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वैद्यकीय पथकाने निष्कर्ष काढला की सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे.

हत्या प्रकरणात एफआयआर

6 जानेवारी 2015 रोजी दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचे सांगत या संदर्भात एफआयआर दाखल केला. सुनंदा पुष्कर यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने आरोप केला होता की पुष्कर यांचे अनेकदा थरुर यांच्याशी भांडण व्हायचे. हत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी थरूरला धमकी दिली होती की ती “त्यांचे पितळ उघडे पाडेल” आणि अशा प्रकारे थरुर “नेस्तनाभूत” होतील

मे 2018 मध्ये, थरूर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 306 आणि 498 ए अंतर्गत पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आणि वैवाहिक क्रूरतेचा आरोप लावण्यात आला. मात्र थरूर यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन यामागे आपला सहभाग असल्याचा दावा नाकारला. दिल्लीतील न्यायालयात यासंबंधी निकाल प्रलंबित आहे.

संबंधित बातम्या :

K. M. Nanavati | माझ्या बायकोशी लग्न करशील का? प्रेम आहुजाच्या उत्तरानंतर तीन गोळ्या झाडल्या, काय आहे नानावटी केस?

अभिनेत्री प्रिया राजवंशची गळा दाबून झालेली हत्या, लिव्ह इन पार्टनर चेतन आनंदच्या मुलांवरच होता आरोप

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....