Kalyan Crime News : गर्भाशयाची तपासणी करण्यासाठी दाखल झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांच्या आरोपामुळं…

कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक संतापले आहे. नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

Kalyan Crime News : गर्भाशयाची तपासणी करण्यासाठी दाखल झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांच्या आरोपामुळं...
apex hospitalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 7:55 AM

कल्याण : कल्याणमध्ये (kalyan crime news in marathi) एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांवरती नातेवाईकांनी (kalyan today news) केलेल्या आरोपामुळं खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करुन नातेवाईकांना समजून सांगितलं आहे. त्याचबरोबर त्या महिलेचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपास करणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. गर्भाशयाची तपासणी करण्यासाठी दाखल झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे हा गोंधळ झाला असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. विशेष म्हणजे नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातल्यामुळे तिथं पोलिसांना (kalyan police) पाचारण करावे लागले.

महिलेचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी हॉस्पीटलची चौकशी करावी अशी मागणी लावून धरली होती. त्यावेळी तिथं आलेल्या पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचबरोबर पुढील तपास करणार असल्याची माहिती नातेवाईकांना सांगितलं आहे.

कल्याणमध्ये राहणारे श्रीकांत लोखंडे यांच्याशी पत्नी पूजा लोखंडे यांचा 2016 ला विवाह झाला. इतक्या वर्षात त्यांना मुलं होत नसल्यामुळे त्यांच्या गर्भाशयाची चाचणी मागच्या सहा महिन्यापासून कल्याणमधील अपेक्स रुग्णालयात सुरु आहेत. विशेष म्हणजे दुर्बीणीच्या साहाय्याने चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी त्या महिलेच्या चाचण्या सुरु होत्या, त्यावेळी पूजाचे ब्लड प्रेशर वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटर ठेऊन उपचार सुरु केले. परंतु तीन तासांनी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.

रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी त्या महिलेची प्रकृती एकदम व्यवस्थित होती. त्यामुळं नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आणि मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं जाहीर केलं. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. त्याचबरोबर संतापलेल्या नातेवाईकांना शांत केलं. हॉस्पिटलची चौकशी करण्याचं आश्वासन पोलिसांनी नातेवाईकांना दिल्यानंतर ते शांत झाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.