पोलिसांवर विश्वास नाही, स्वप्निलच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करा; आई-वडिलांची मागणी

स्वप्निलची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा संशय त्याच्या परिवारानं यापूर्वीच केला आहे. या घटनेला चार दिवस उलटले असतानाही अद्याप पोलिसांकडून स्वप्निलच्या परिवाराला कुठलिही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास नसल्याचा आरोप स्वप्निलच्या आई-वडिलांनी केलाय. त्यामुळे स्वप्निलच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी आई-वडिलांनी केलीय.

पोलिसांवर विश्वास नाही, स्वप्निलच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करा; आई-वडिलांची मागणी
स्वप्निल शिंदे मृत्यू प्रकरण
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 3:32 PM

बीड : नाशिकमधल्या आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये स्वप्निल शिंदे या विद्यार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. स्वप्निल शिंदेच्या मृत्यूनंतर आता त्याच्या आई-वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. स्वप्निलची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा संशय त्याच्या परिवारानं यापूर्वीच केला आहे. या घटनेला चार दिवस उलटले असतानाही अद्याप पोलिसांकडून स्वप्निलच्या परिवाराला कुठलिही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास नसल्याचा आरोप स्वप्निलच्या आई-वडिलांनी केलाय. त्यामुळे स्वप्निलच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी आई-वडिलांनी केलीय. (Investigate Swapnil Shinde’s death case through CBI)

महत्वाची बाब म्हणजे संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या स्वप्निल शिंदेच्या दोन बरगड्या तुटल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आता वाढलं आहे. त्यामुळे स्वप्निलच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेला घातपाताचा संशयही आता बळावला आहे. स्वप्निल शिंदेच्या बरगड्या कश्या तुटल्या, असा प्रश्न त्याच्या कुटुंबियांकडून विचारण्यात येतोय.

दोन मुलींच्या रॅगिंगमुळे डॉक्टरची आत्महत्या

मृत विद्यार्थी डॉक्टर गायनॅकॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मृत स्वप्निल याची दोन मुलींनी सतत रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला केला. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला घाबरल्यामुळे आमच्या मुलाने आत्महत्या केली आहे, असा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीदेखील यावेळी मृत विद्यार्थी डॉक्टरच्या नातेवाईकांनी केली आहे.

विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरु होते, यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न

तर दुसरीकडे कॉलेज प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. मृत्यू झालेल्या विद्यार्थी डॉक्टरला आम्ही वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. या डॉक्टरवर मानसोपचार सुरू होते. मानसिक स्थिती ठीक नसल्याने डॉक्टर असलेल्या विद्यार्थ्याच्या आईला आम्ही डॉक्टरसोबत हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिली होती, अशी माहिती कॉलेज प्रशासनाने दिली आहे.

नेमकं सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल

दरम्यान या घटनेनंतर मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस करत असून, नेमकं काय सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या :

स्टंटबाजी कशाला करताय, आमचीही तीच भूमिका, पडळकरांच्या बैलगाडा शर्यतीनंतर अजित पवारांचं मोठं भाष्य

शरद पवार म्हणाले, आजोबांची पुस्तकं वाचा, राज ठाकरेंनी ऐकलं, प्रबोधनकारांचा दाखला देत सडेतोड प्रत्युत्तर!

Investigate Swapnil Shinde’s death case through CBI

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.