Shocking : पतीच्या प्रायव्हेट पार्टवर पत्नीने ओतलं उकळतं पाणी! आय..आय..गं करत झोपेतच कळवळला पती, असं का केलं तिनं?

उकळतं पाणी प्रायव्हेट पार्टवर पडल्यानं थांगराज गंभीर जखमी झाला. जखमी पतीचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजलाय. जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात या पतीला दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते.

Shocking : पतीच्या प्रायव्हेट पार्टवर पत्नीने ओतलं उकळतं पाणी! आय..आय..गं करत झोपेतच कळवळला पती, असं का केलं तिनं?
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 10:23 AM

मुंबई : नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक भयंकर किस्से तुम्ही ऐकले असतील. पण आता तर एका बायकोनं आपल्या नवऱ्यासोबत (Husband Wife clash) रागाच्या भरात जे कृत्य केलंय, ते काळजाचा थरकाप उडवणारं आहे. चक्क नवरा झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं उकळतं पाणी ओतलं. ही धक्कादायक घटना आहे, तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातल्या रानीपत (Ranipat District) जिल्ह्यातली. 29 वर्षीय तरुण पत्नीनं आपल्या पतीसोबत केलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. या धक्कादायक घटनेत 32 वर्षांचा पती गंभीर जखमी झालाय. पतीच्या प्रायव्हेट पार्टला जबर दुखापत झाली असून त्याचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजलाय. जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी आता पत्नीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नीनं असं नेमकं का केलंय, याचं कारणही समोर आलं आहे. वेगवेगळ्या कलमांखाली सध्या आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत.

का केलं असं?

पती आपल्याशी एकनिष्ठ नाही, अशा संशय टी प्रिया या 29 वर्षीय विवाहीत तरुणीला आला होता. याच संशयातून प्रियाने एल थांगराज या 32 वर्षीय पतीवर राग काढायचं तिने ठरवलंय. संतापलेल्या प्रियाने एके दिवशी थांगराज घरी झोपलेले असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवरच उकळतं पाणी ओतरलं. रानिपत जिल्ह्यातील एका गावातील प्रिया आणि थांगराज या दाम्पत्यासोबतची ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

उकळतं पाणी प्रायव्हेट पार्टवर पडल्यानं थांगराज गंभीर जखमी झाला. जखमी पतीचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजलाय. जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात या पतीला दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्याला अधिक उपचारांसाठी दुसऱ्या एक बड्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. याप्रकरणी आता पत्नीवर कलम 294 ब, 324, 506, 506 (2) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत या दाम्पत्याचं लग्न सात वर्ष आधी झालं होतं. या दाम्पत्याला एक लहान मुलगीही आहे. प्रियाला थांगराजवर गेल्या काही दिवसांपासून संशय आला होता. त्यातून त्यांच्या वादही झाले होते. शनिवारी जेव्हा थांगराज घरी परतला आणि खोलीत जाऊन झोपला होता. त्यावेळी प्रियाने बाथरुमच्या गिझरमधून पाणी गरम केलं, एका बादलीत भरलं आणि झोपी गेलेल्या आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवरच ओतलं होतं.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.