साधू नव्हे सैतान… उपचारासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या तरुणीवर वांरवार अत्याचार; कुटुंबाला कळताच…

तरूणीची तब्येत काही दिवसांपूर्वी बिघडली असता कुटुंबिय तिला तांत्रिकाकडे घेऊन गेले होते. मात्र उपचारांच्या बहाण्याने तो तिच्याशी दुष्कृत्य करत राहिला.

साधू नव्हे सैतान... उपचारासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या तरुणीवर वांरवार अत्याचार; कुटुंबाला कळताच...
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 4:41 PM

लखनऊ | 25 ऑगस्ट 2023 : मानवतेला काळिमा फासणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे एका तांत्रिकाने उपचारांसाठी आलेल्या तरूणीसोबत दुष्कृत्य (crime news) केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. पीडित तरूणी गर्भवती राहिल्यावर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

हे धक्कादायक प्रकरण हमीरपूर जिल्ह्यातील चिकासी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. तिथे उपचारासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला तांत्रिकाने अंमली पदार्थ पाजून तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची तब्येत बिघडली होती, तेव्हा पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला तांत्रिकाकडे नेले.

तेथे त्या नराधम तांत्रिकाने किशोरीला मादक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर तिची तब्येत सुधारण्याच्या उद्देशाने तो तिला वारंवार बोलावत राहिला आणि वारंवार अत्याचार करत राहिला.

त्याच्या या अत्याचारामुळे ती तरूणी गर्भवती राहिली असता, त्या तांत्रिकाने तिला धमकावले आणि तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेने तिच्या कुटुंबियांना ही संपूर्ण घटना सांगितली. पीडितांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवत न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी नराधम तांत्रिकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.