जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचे सत्र; ‘या’ राज्यातील दोघांवर दहशतवाद्यांनी झाडल्या गोळ्या

काश्मीर झोन पोलिसांनी एका ट्विटमध्ये हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पुलवामाच्या खारपोरा रत्नीपोरा येथे दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांना गोळ्या घालून जखमी केले.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचे सत्र; 'या' राज्यातील दोघांवर दहशतवाद्यांनी झाडल्या गोळ्या
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचे सत्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 6:05 AM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग (Target Killing)चे सत्र सुरु झाले आहे. शनिवारी पुलवामा जिल्ह्यात एक मोठी दहशतवादी (Terrorist) घटना घडली. रत्नीपोरा येथे दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांवर गोळीबार (Firing) करून त्यांना जखमी केले. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. दोघेही मजूर मूळचे बिहारचे आहेत. याआधीही अनेकदा परप्रांतीय मजूरांना टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे टार्गेट किलिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुदैवाने जीवावरचा धोका टळला; प्रकृती स्थिर

दहशतवादी हल्ल्यात दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या जीवावरचा धोका टळला आहे. सध्या दोन्ही मजूरांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही जखमी मजूर बिहारच्या बेतिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी ट्विटद्वारे दिली माहिती

काश्मीर झोन पोलिसांनी एका ट्विटमध्ये हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पुलवामाच्या खारपोरा रत्नीपोरा येथे दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय मजुरांना गोळ्या घालून जखमी केले.

दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बेतिया जिल्ह्यातील रहिवासी शमशाद आणि फैजान कासरी अशी मजूरांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या महिन्यातही हल्ला झाला होता

गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाही परप्रांतीय मजुरांवर हल्ला केला गेल्याची घटना घडली होती. 5 ऑगस्टला पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांवर ग्रेनेड फेकले होते. या दहशतवादी घटनेत एक मजूर ठार झाला, तर दोन जण जखमी झाले.

दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेला बिहारमधील मजूर होता. तीन वर्षांपूर्वी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केले गेले होते. त्याला तीन वर्षे झाली, त्याच दिवशी परप्रांतीय मजुरांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.