धक्कादायक, विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शिक्षकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सरकारी शाळेतील शिक्षकानं पाच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. Teacher accused of raping five girl students

धक्कादायक, विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शिक्षकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 3:16 PM

हैदराबाद: शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना तेलंगाणामध्ये घडली आहे. तेलंगाणाच्या भद्रादी कोठागुडेमच्या चिंतवारे येथील सरकारी शाळेतील शिक्षकानं पाच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाच मुलींचं लैगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Teacher accused of raping five girl students in Telangana)

आरोपी शिक्षकानं ऑगस्ट महिन्यात 6 ते 10 वयोगटातील पाच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपी मुलींवर अत्याचार करण्यापूर्वी मुलींना पॉर्न फिल्म दाखवायचा त्यानंतर चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवण्यास सांगत होता.

ऑगस्ट महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. आरोपीने मुलींमध्ये दहशत निर्माण केली होती त्यामुळे त्यांनी कोठेही या प्रकाराबद्दल वाच्यता केली नाही. मात्र, पीडित मुलगी आजारी पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर पीडित मुलींनं या प्रकराची माहिती तिच्या कुटुंबीयांना आणि डॉक्टरांना दिली. पीडित मुलीवर उपचार सुरु असताना हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी डोडा सुनील याच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Teacher accused of raping five girl students in Telangana)

भद्राद्री कोठागुडेमचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला या प्रकाराबद्दल अधिक माहिती दिली आहे.”लक्ष्मीदेवपल्ली मंडलमधील चिंतवारे गावातील शाळेमधील शिक्षक डोडा सुनीलला अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत आणखी चार मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झालं. पीडित मुली 6 ते 10 वयोगटातील आहेत.

ऑगस्टपासून सुरु होता प्रकार

शिक्षकाकडून ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत मुलींवर अत्याचार सुरु होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी डोडा सुनीलविरोधात लक्ष्मीदेवपल्ली पोलीस ठाण्यात आयपीसी 376AB आणि POCSO अ‌ॅक्ट कलम 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Teacher accused of raping five girl students in Telangana)

जिल्हा शिक्षणाधिकारी सोमशेखर शर्मा यांनी डोडा सुनील याला निलंबित केल्याची माहिती दिली आहे. पाच मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात शाळेत विद्यार्थ्यांना बोलवण्यास मनाई करण्यात आली असताना डोडा सुनीलने सर्व नियम धाब्यावर बसवत विद्यार्थिनींना शाळेत बोलावले होते.

संबंधित बातम्या:

नवी मुंबईत बांगलादेशी तरुणीची बॉयफ्रेंडकडून हत्या; तीन आठवड्यांनी कुजलेला मृतदेह मिळाला

सातारा हादरलं, धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या

(Teacher accused of raping five girl students in Telangana)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.