AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jai Shree Ram Row: ‘जय श्री राम’ बोलला नाही म्हणून मुस्लिम युवकावर हल्ला! नेमकी कुठं घडली घटना?

कूण 14 जणांनी ही मारहाण केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Jai Shree Ram Row: 'जय श्री राम' बोलला नाही म्हणून मुस्लिम युवकावर हल्ला! नेमकी कुठं घडली घटना?
| Updated on: Jul 23, 2022 | 10:28 AM
Share

जय श्री रामचा (Jai Shree Ram Row) नारा दिला नाही म्हणून एका अल्पवयीन युवकावर हल्ला करण्यात आला. ही घटना हैदराबादमध्ये घडली. गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. हैदराबादच्या (Hyderabad News) जुन्या शहरातील बोनालू जुलूसच्या दरम्यान, जय श्री रामचे नारे दिले जात होते. यावेळी एका 17 वर्षांच्या मुस्लिम युवकानं जय श्री रामचा नारा दिला नाही, म्हणून काही जणांना या युवकाला मारहाण (Minor Youth Beaten) केली. या घटनेमुळे रात्री उशिरा चारमीनार परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत तत्काळ कारवाई केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. मोहम्मद शाहिद उर्फ अफरीदी असं मारहाण करण्यात आलेल्या 17 वर्षांच्या पीडित अल्पवयीन युवकाचं नाव आहे. एकूण 14 जणांनी ही मारहाण केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी मारहाण प्रकरणी संशयित आरोपी म्हणून 14 ही जणांची ओळख पटवली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या 14 जणांना ताब्यात घेण्यात आल्यचाी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं? कुठे घडलं?

शाहिद रात्री उशिरा घरी चालला होता. तो ज्या रस्त्यावरुन जात होता, त्याच रस्त्यावरुन एक मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शाहिदला थांबण्यात आलं. त्याच्या कपाळावर टिळा लावण्यात आला आणि त्यानंतर त्याला जय श्री रामचा नारा लावण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. पण शाहिदनं नारा लावण्याच विरोध केला. त्यामुळे त्यांना काही युवकांना बेदम मारहाण केली. हैदराबादच्या चारमहार परिसरात ही घटना घडली.

पोलीस तपास सुरु

या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. यानतंर शाहिदने चारमीनार पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आणि अखेर गुन्हाही दाखल झाला. पोलिसांनी या घटनेनंतर मुख्य आरोपी रुपेश शर्मा याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून या संपूर्ण घटनेप्रकरणी चौकशी केली जातेय. ते संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांकडून योग्य ती खबरदारीही घेतली जातेय.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.