रीलमध्ये भगव्या ध्वजाचा अपमान करणाऱ्या मुस्लिम युवकाला चोपलं, नेकेड करुन धिंड

हिंदूसाठी धार्मिक दृष्टीने पवित्र असलेल 'ओम चिन्ह' त्या भगव्या ध्वजावर होतं. हिंदू ध्वजाचा अपमान होईल, अशा पद्धतीने हे रील बनवण्यात आलं होतं, असा मारहाण करणाऱ्यांचा आरोप आहे.

रीलमध्ये भगव्या ध्वजाचा अपमान करणाऱ्या मुस्लिम युवकाला चोपलं, नेकेड करुन धिंड
police
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 10:23 AM

हैदराबाद : भगव्या ध्वजाच अपमान करणारं रील अपलोड केल्या प्रकरणी एका मुस्लिम युवकाला मारहाण करण्यात आली. रीलमध्ये मुस्लिम युवक भगव्या ध्वजाचा अपमान करताना दिसत होता. हिंदुंसाठी धार्मिक दृष्टीने पवित्र असलेल ‘ओम चिन्ह’ त्या भगव्या ध्वजावर होतं. हिंदू ध्वजाचा अपमान होईल, अशा पद्धतीने हे रील बनवण्यात आलं होतं, असा मारहाण करणाऱ्यांचा आरोप आहे.

तेलंगणच्या संगारेड्डी येथे ही घटना घडली. मुस्लिम युवकाला मारहाण करुनच जमाव थांबला नाही, त्याला विवस्त्र करुन त्याची धिंड काढण्यात आली. ही रील पाहिल्यानंतर मेडक जिल्ह्यातील गावकरी संतप्त झाले. त्यांनी या युवकाला शोधून काढल व मारहाण केली. काही व्हिडिओमध्ये जमाव ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहे. त्याच बरोबर युवकाला मारहाण सुद्धा सुरु आहे. त्याची नेकेड परेड काढून त्याच्या गुप्तांगाला सुद्धा आग लावण्याचा प्रयत्न झाला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

मुस्लिम युवकाने नोंदवली तक्रार

हिंदुंच्या भावना दुखावल्याप्रकरणी गावकऱ्यांनी युवकाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. आयपीसीच्या कलम 153(अ), 295-अ, 505(2) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मारहाण केली म्हणून मुस्लिम युवकाने सुद्धा गावकऱ्यांविरोधात तक्रार नोंदवलीय. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांविरोधात आयपीसीच्या कलम 341, 323, 505(2) आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.