ऐकावं ते नवल, हत्येच्या खटल्यात कोंबडा पोलीस कोठडीत, कोर्टासमोरही हजर करणार

तेलंगणात एक विचित्र घटना घडलीय. एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांना थेट कोंबड्यालाच ताब्यात घ्यावं लागलंय.

ऐकावं ते नवल, हत्येच्या खटल्यात कोंबडा पोलीस कोठडीत, कोर्टासमोरही हजर करणार
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 12:52 AM

हैदराबाद : तेलंगणात एक विचित्र घटना घडलीय. एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांना थेट कोंबड्यालाच ताब्यात घ्यावं लागलंय. इतकंच नाही तर या कोंबड्याला न्यायालयासमोर हजरही करण्यात येणार आहे. ही घटना तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील येल्लम्मा मंदिरात कोंबड्यांची झुंज सुरु होती. त्यावेळी झुंजीतील एका कोंबड्याने प्रेक्षकांपैकी एक असलेल्या 45 वर्षीय टी. सतीश यांच्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात सतीश गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं (Telangana police going to present Cock in front of Court in Murder Case).

झुंज लावण्यात आलेल्या कोंबड्याच्या पायाला चाकू बांधण्यात आला होता. झुंज सुरु असताना या कोंबड्याने अचानकपणे बाजूला असलेल्या थानुगुला सतीश यांच्यावर हल्ला केला. यात सतीश यांच्या पोट आणि मांड्यांच्या मधल्या भागात मोठी जखम झाली. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी लोथुनुर गावात घडली. या ठिकाणी कोंबड्यांच्या बेकायदेशीर लढा ई लावण्यात येत होती.

झुंज लावण्यात आलेल्या कोंबड्याच्या पायाला धारदार चाकू

झुंज लावण्यात आलेल्या कोंबड्याच्या पायाला एक धारदार चाकू लावण्यात आला होता. अचानक संबंधित कोंबडा आजूबाजूला असलेल्या माणसांकडे गेला आणि आपले पंख फडफडू लागला. त्यावेळ कोंबड्याने आपले पायही जोरजोराने हलवले. यामुळे कोंबड्याच्या पायाला बांधलेला चाकू लागून बाजूला उभ्या असलेल्या सतीश यांच्या पोट आणि मांडीच्या मध्ये गंभीर जखमा झाल्या. यानंतर त्यांना ताबोडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

बंदी असतानाही तेलंगाणात कोंबड्यांच्या झुंजी

तेलंगणात कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी आहे. असं असतानाही येल्लम्मा मंदिरात बेकायदेशीरपणे लपून छपून ही झुंज सुरु होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाने संबंधित कोंबड्याला पोलीस ठाण्यात आणलं आहे. येथे त्याला पोलीस कर्मचाऱ्यांच्या निरिक्षणात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी या कोंबड्याच्या खाण्यासाठी दाण्यांचीही व्यवस्था केलीय.

पोलिसांनी या प्रकरणात कोंबड्याला अटक केल्याचं बोललं जात होतं. मात्र, पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त फेटाळलंय. मात्र, कोंबड्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं. न्यायालयाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा :

कोंबड्यांचा ट्रक उलटला, पळवापळवीसाठी नागरिकांची झुंबड, 300 कोंबड्यांची लूट

व्हिडीओ पाहा :

Telangana police going to present Cock in front of Court in Murder Case

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.