Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा

चालकाचा मोबाईल ट्रेस केल्यानंतर तो आणी अंबड रोडवरील शहापूर जवळ चालकासह अपहरण झालेला मुलगा आढळून आला.

जालन्यात थरार नाट्य; चार कोटींची मागणी करत दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण, अवघ्या पाच तासात पोलिसांनी लावला छडा
विद्यार्थीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:37 PM

जालना : राज्यात अनेक जिल्ह्यात या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तर अनेक जिल्ह्यातील पोलिस त्या सोडवत आहे. तर अनेक जिल्ह्यातील पोलिसांनाच गुन्हेगार आता आव्हान निर्माण करत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात सतत चकमक होत आहे. या घटना प्रामुख्याने मुंबई-पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरात अशा घटना होताना दिसत असतात. मात्र आता अशा घटना जालन्यासारख्या (jalana)जिल्ह्यात ही होताना दिसत आहेत. येथे एका व्यावसायिक महावीर गादिया यांच्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आल्याने तसेच त्याच्या सुटकेसाठी चार कोटींच्या खंडणीची मागणी झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी अख्खा शहरात पसरल्याने या अपहरणाच्या (kidnapping) घटनेमुळं शहरच हदरलं. तसेच अख्या शहरातच भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र जालना पोलिसांनी (Jalna police) या घटनेकडे गांभीर्याने बहत पावले उचलली आणि अवघ्या पाच तासात मुलाला शोध घेतला. तसेच एकाच्या मुस्क्या आवळल्या असून इतर अपहरण कर्त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मुलगा हवा असल्यास चार कोटीं रुपये आणून द्या

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जालना शहरात भरदिवसा एका व्यावसायिक महावीर गादिया यांचा मुलगा स्वयम् (16 वर्ष) हा दहावीत शिकतो. तो पेपर देण्यासाठी पोद्दार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. त्यानंतर घरी रात्री बारापर्यंत ही तो परत आला नाही. त्यावर व्यावसायिक गादिया यांनी ड्राइव्हरच्या मोबाईलवर call केला. त्यावेळी एका अज्ञात अपहरणकर्त्यांनी मुलगा हवा असल्यास चार कोटीं रुपये आणून द्या अशी मागणी केली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं

दरम्यान मुलगा घरी न परतल्याने व्यावसायिक गादिया यांनी पोलिसांनी याची माहिती दिली होती. आणि हा फोन झाल्याने आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचे कळाले. त्याचवेळी त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. आणि मग तपासाची चक्रे जलद गतीने हालली. यावेळी पोलिसांनी जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली. त्यावेळी त्यांना चालकाचा मोबाईल ट्रेस केल्यानंतर तो आणी अंबड रोडवरील शहापूर जवळ चालकासह अपहरण झालेला मुलगा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पोलीस इतर अपहरणकर्त्याचा या प्रकरणात शोध घेत आहेत.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.