कोल्हापूरहून बंगळुरुला निघालेल्या खासगी बसचा भीषण अपघात, 8 ठार! मृतांमध्ये पुणे, कोल्हापुरातील प्रवासी
Dharwad Accident : मृतांमध्ये कर्नाटकातील 2 दोघांचा तर 6 जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील आहेत.
कर्नाटक : हुबळी-धारवाडच्या (Hubali-Dharwad Accident News) तरीहाळा बायपासवर भीषण अपघात झाला. लॉरी आणि खासगी बसची जोराची धडक होऊ अपघातात (Road accident) 8 जण ठार झालेत. तर 28 जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये कर्नाटकातील 2 दोघांचा तर 6 जण कोल्हापूर आणि पुणे (Kolhapur & Pune News) जिल्ह्यातील आहेत. जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून बंगळुरुच्या दिशेनं ही बस जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. ओव्हरटेकींग करण्याच्या नादात हा अपघात घडला. एका ट्रॅक्टरला भरधाव वेगानं जाणारी खासगी बस ओव्हरटेक करत होती. त्यावेळी हा अपघात घडल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
The #HDpolice had tough time clearing the traffic on the highway after the mishap. The bypass stretch between #Hubballi and #Dharwad is not new to accidents. Process to widen the 32 km stretch of highway is underway@NewIndianXpress @XpressBengaluru @KannadaPrabha @JoshiPralhad pic.twitter.com/6jzU2HJGoO
हे सुद्धा वाचा— Amit Upadhye (@Amitsen_TNIE) May 24, 2022
दोन्ही वाहनांचे ड्रायव्हर ठार
बस आणि लॉरी या दोन्ही वाहनांचे चालक या भीषण अपघातामध्ये जागीच ठार झाले आहेत. तर इतर जखमींवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. अपघाताच्या या घटनेनं एकच खळबळ उडाली.
In a ghastly accident 7 died & 28 persons have been grievously injured after a lorry and bus rammed into each other on the #Hubbali–#Dharwad bypass. The incident took place around midnight on Tuesday. The bus was headed from #kolhapur to #Bengaluru. pic.twitter.com/e10V3MHjKi
— Imran Khan (@KeypadGuerilla) May 24, 2022
कसा झाला अपघात?
खासगी बस एका ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होती. यावेळी ओव्हरटेकींच्या नादात समोर येणाऱ्या ट्रक आणि लॉरीची जोरदार समोरसमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की दोन्ही वाहनांच्या चालकांना जबर मार बसून त्यांचा जागीच जीव गेलाय.
Doctors treat injured at #KIMS Hospital in #Hubballi The death toll in the accident rises to 8 @NewIndianXpress @XpressBengaluru @KannadaPrabha @HemanthTnie @Arunkumar_TNIE @hublimandi @HubliCityeGroup @Hubballi_Infra @Namma_Dharwad @Namma_HD @HiremathTnie @HubballiRetweet pic.twitter.com/5irD44KCQL
— Amit Upadhye (@Amitsen_TNIE) May 24, 2022
दोन्ही वाहनचालकांसह एकूण 8 जण या अपघातात ठार झाले. तर अन्य गंभीर जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान, काहींची प्रकृती चिंताजनक असून अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
पाहा व्हिडीओ :
मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु
अद्याप अपघातातील सर्व मृतांची ओळख पटू शकलेली नाही. सध्या या अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच धारवाडमध्ये आणखी एक भीषण अपघात झालेला. या अपघातामध्येदेखील आठ जणांचा जीव गेला होता. लग्नकार्य उरकून परतत असणाऱ्या कुटुंबीयांची भरधाव क्रूझर गाडी झाडावर आदळून भीषण दुर्घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता धारवाडमध्ये आणखी एका भीषण अपघातानं खळबळ उडालीय.
किती वाजता झाला अपघात?
सोमवारी मध्यरात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असावा, असं सांगितलं जातंय. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं तत्काळ बचावकार्य करण्यास सुरुवात केली. क्रेनच्या मदतीनं यावेळी अपघातग्रस्त बस आणि लॉरी हटवण्यात आली होती. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.