Thailand : थायलंड सरकारचे नराधमांविरोधात कठोर पाऊल, लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी उचलले ‘हे’ पाऊल

थायलंडमध्ये तुरुंगातून सुटून आलेले पुन्हा गुन्हा करताना आढळून आले आहे. अशा गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी थायलंड सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने आता नराधमांना तुरुंगातून सुटून बाहेर येताना त्यांचे नपुंसकत्व केले जाणार आहे.

Thailand : थायलंड सरकारचे नराधमांविरोधात कठोर पाऊल, लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी उचलले 'हे' पाऊल
बलात्कार प्रकरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 10:23 PM

बँकॉक : जगभरातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यासाठी थायलंड सरकार (Thailand Government)ने कठोर पाऊल उचलले आहे. लैंगिक गुन्हेगारांना शिक्षेत घट करायची असेल तर नपुंसक होण्याचे इंजेक्शन (Injection) घेण्याचा पर्याय थायलंड सरकारने उपलब्ध दिला आहे. तसे विधेयक (Bill)च थायलंड सरकारने आणले आहे. या विधेयकाला कायदेशीर मंजुरी मिळाल्यानंतर लैंगिक गुन्हे कमी करण्यासाठी हा निर्णय अंमलात आणला जाईल. तुरुंगातून बाहेर यायचे असेल किंवा शिक्षेत कपात हवी असेल तर स्वेच्छेने नंपुसकत्वाची औषधे घेण्याचा पर्याय सरकारने दिला आहे.

2013 ते 2020 दरम्यान 4,848 गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केल्याचे उघड

कनिष्ठ सभागृहाने मार्चमध्ये मंजूर केलेले विधेयक सोमवारी उशिरा 145 सिनेटर्सनी मंजूर केले.यावेळी दोन सिनेटर्स गैरहजर होते. मात्र अद्याप दुसर्‍या हाऊसकडून मंजुरी बाकी आहे. त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. 2013 ते 2020 दरम्यान थायलंडच्या तुरुंगातून सुटका झालेल्या 16,413 दोषी लैंगिक गुन्हेगारांपैकी 4,848 जणांनी पुन्हा गुन्हा केल्याचे सुधारणा विभागाच्या आकडेवारीनुसार निदर्शनास आले. थायलंडमध्ये तुरुंगातून सुटून आलेले पुन्हा गुन्हा करताना आढळून आले आहे. अशा गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी थायलंड सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने आता नराधमांना तुरुंगातून सुटून बाहेर येताना त्यांचे नपुंसकत्व केले जाणार आहे. बिलानुसार गुन्हेगारांवर 10 वर्षांपर्यंत नजर ठेवली जाईल आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग ब्रेसलेट घालणे आवश्यक आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास, थायलंड केमिकल कास्ट्रेशन वापरणार्‍या देशांच्या गटात सामील होईल. त्यापैकी पोलंड, दक्षिण कोरिया, रशिया आणि एस्टोनिया आणि काही यूएस राज्यांचा समावेश आहे.

गुन्हेगारांचे यापुढे पुनर्वसन करता येणार नाही – जेडेड चौविलाई

न्यायमंत्री सोमसाक थेपसुथिन यांनी मंगळवारी सांगितले की, हा कायदा लवकर मंजूर व्हावा अशी माझी इच्छा आहे. मला महिलांसोबत अत्याचार असल्याच्या बातम्या पुन्हा ऐकायला यायला नकोत. महिला आणि पुरुष प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट फाउंडेशनचे संचालक, जेडेड चौविलाई म्हणाले की, केमिकल कास्ट्रेशनचा वापर करुन लैंगिक गुन्हे रोखता येणार नाहीत. तुरुंगात असताना त्यांची मानसिकता बदलून दोषींचे पुनर्वसन झाले पाहिजे. फाशी किंवा इंजेक्टेड कास्ट्रेशन सारख्या शिक्षेचा वापर केल्याने गुन्हेगारांचे यापुढे पुनर्वसन करता येणार नाही, असे ते म्हणाले. (Thailand governments strict decision to prevent sexual harrassment of women)

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.