AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : नोकरीचे आमिष दाखवत तरुणाला लाखोंचा गंडा, ऑनलाईन रिक्रुटमेंट पोर्टलवरुन नोकरी शोधणे महागात पडले !

ऑनलाईन पोर्टलद्वारे नोकरी शोधणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तरुणावर लाखो रुपये गमावण्याची वेळ आली आहे.

Thane Crime : नोकरीचे आमिष दाखवत तरुणाला लाखोंचा गंडा, ऑनलाईन रिक्रुटमेंट पोर्टलवरुन नोकरी शोधणे महागात पडले !
पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला गंडा
| Updated on: Jul 28, 2023 | 2:41 PM
Share

ठाणे / 28 जुलै 2023 : ऑनलाईन रिक्रुटमेंट पोर्टलवर बायोडेटा अपलोड करत असाल सावध रहा. नोकरीच्या नावाखाली तुमच्यासोबतही फसवणूक होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या 32 वर्षीय तरुणाची पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवत 37 लाखांची फसवणूक केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये चौघांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू आहे. पीडित तरुण सध्या कार्यरत असलेल्या कंपनीत त्याचा करार संपत आला आहे. यामुळे नवीन नोकरीच्या शोधात होता. यासाठी त्याने आपला बायोडेटा दोन ऑनलाइन रिक्रुटमेंट पोर्टलवर अपलोड केला होता.

व्हॉट्सअप मॅसेज करत पार्ट टाईम नोकरीची ऑफर दिली

यानंतर तरुणाला एका अज्ञात व्यक्तीचा व्हॉट्सअप मॅसेज आला. या मॅसेजमध्ये पार्ट टाईम जॉबची ऑफर देण्यात आली होती. इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या विविध सेलिब्रिटींच्या पोस्टला प्रति लाईक 70 रुपये प्रमाणे दररोज 2000 ते 3000 रुपये कमावण्याची ऑफर देण्यात आली होती, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. यानंतर तरुणाला टेलीग्राम अॅपवर दुसर्‍या ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये त्याला काही क्रिप्टो करन्सी टास्क देण्यात आले होते. यात त्याला क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइन्स विकत घेण्यासाठी एक विशिष्ट रक्कम जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोपींनी दिलेल्या लॉगिन तपशीलांसह तरुणाने वेबसाइटवर प्रवेश केला.

आधी छोटी रक्कम भरण्यास सांगत परतावा दिला

तरुणाने 9000 रुपये दिले आणि त्या बदल्यात त्याला 9,980 रुपये मिळाले. यामुळे त्याला अधिक नफा मिळेल याची खात्री पटली. त्याने पुन्हा 30,000 रुपये दिले आणि 8,208 रुपये नफा मिळाला. यानंतर त्याला ‘व्हीआयपी’ गटात अपग्रेड करत मोठी रक्कम भरण्यास सांगितले. मोठी रक्कम गुंतवताच तरुणाला पैसे परत मिळवण्यासाठी आणखी पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले. असे तरुणाने एकूण 37.03 लाख रुपये दिले. परंतु त् याबदल्यात काहीही मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.