Gadchiroli Murder & Suicide : प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला, प्रियकराची गळफास घेत आत्महत्या

कोरची मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या टेंमली गावातील मुलाने बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गावातील 17 वर्षीय मुलीच्या मानेवर चाकूने 12-13 वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Gadchiroli Murder & Suicide : प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला, प्रियकराची गळफास घेत आत्महत्या
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 5:22 PM

कोरची : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून 17 वर्षीय प्रेयसीवर चाकूहल्ला (Knife Attack) करत प्रियकराने स्वतः गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गडचिरोलीतील उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी (Injured) झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विक्रम ग्यानसिंग फुलकवर (20) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुलीला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या बहिणीवरही तरुणाने चाकूने वार केले. या घटनेचा अधिक तपास बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल नानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुंभारे करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुलीला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळते.

प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून चाकू हल्ला

कोरची मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या टेंमली गावातील मुलाने बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गावातील 17 वर्षीय मुलीच्या मानेवर चाकूने 12-13 वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीचे आणि विक्रमचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. याच प्रेमप्रकरणातून दोघांमध्ये वाद झाला आणि विक्रमने चाकूने मुलीवर सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली. यावेळी मुलीला वाचवण्यासाठी तिची बहिण मधे पडली असता तरुणाने तिच्यावर चाकून वार केले आणि तेथून पसार झाला. मुलींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी दोन्ही मुलींना कोरची रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

हल्ल्यानंतर तरुणाची गळफास घेत आत्महत्या

घटनास्थळावरून पसार झालेल्या विक्रमची शोधाशोध घेणे सुरू झाले. परंतु तो कुठेच आढळून आला नाही. पहाटे सहा वाजता गावातील लोकांना विक्रम आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर बेळगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरचीला पाठवला. शवविच्छेदनानंतर टेंमली येथे सायंकाळी त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत विक्रमला आई-वडील, एक बहीण, एक लहान भाऊ आहेत. (The boyfriend committed suicide after stabbing his girlfriend due to a minor dispute in gadchiroli)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.