बहुचर्चित हत्येचं कारण आले समोर, पोलीस आयुक्तांनीच केला खुलासा…

मालेगाव येथे दाखल झालेला खुनाचा गुन्हा नंतर नाशिक शहर हद्दीतील नाशिकरोड पोलिसांत वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर तपास करण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती.

बहुचर्चित हत्येचं कारण आले समोर, पोलीस आयुक्तांनीच केला खुलासा...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 2:58 PM

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित खुनाचे कारण स्वतः पोलीस आयुक्त (Police Commissioner) जयंत नाईकनवरे यांनीच स्पष्ट केले आहे. फर्निचर उद्योजक असलेले शिरीष सोनवणे (Shirish Sonavane) यांचे अपहरण आणि त्यांनंतर हत्या झाल्याचे समोर आले होते. त्यावरून अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखलही झाला होता. मात्र, खुणाचे कारण स्पष्ट होत नसल्याने आणि संशयित पोलीसांच्या हाती लागत नसल्याने पोलीसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, तीन आठवड्यानंतर खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात नाशिक (Nashikpolice) पोलीसांना यश आले असून खुनामागील कारणही स्पष्ट झाले आहे. याबाबत स्वतः शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषद घेत तिघांना अटक केल्याची माहिती दिली आहे.

9 सप्टेंबरला शिरीष सोनवणे यांची एकलहरे शिवारातून अपहरण झाल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांत देण्यात आली होती त्यावरून अपहरणाची नोंद झाली होती.

त्यानंतर मालेगाव येथील सायतरपाडे येथील कालव्यात त्यांचा मृतदेह आढळून आला होता, त्यात त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर रक्तस्राव झाल्याचे समोर आले होते.

मालेगाव येथे दाखल झालेला खुनाचा गुन्हा नंतर नाशिक शहर हद्दीतील नाशिकरोड पोलिसांत वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर तपास करण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती.

संशयित हाती लागत नसल्याने पोलीसांनी संशयितांचे फोटो प्रसारित करत माहिती असल्यास काळविण्याचे आवाहन केले होते.

त्याच काळात त्यांनी सोनवणे यांच्या मोबाईलचा वापर केल्याचे आढळून आले होते. या बाबीसह सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबीच्या आधारावर आरोपींचा शोध घेण्यात आला आहे.

यामध्ये प्रवीण आनंदा पाटील याला चाळीसगाव येथून अटक केली असून सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर सांगली येथून अटक केली आहे. तर तिसरा दादू नामक याला मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

व्यवसाय करत असतांना आवश्यक लोखंड खरेदीवरुण सोनवणे यांचा खून केल्याची माहिती समोर आली असून कच्चा माल खरेदी करण्यावरून हत्या केल्याची संशयितांनी पोलीसांना कबुली दिली आहे.

व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आणखी यामागे काही कारण आहे का ? याचाही तपास सुरू केला जाणार आहे.

याबाबत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.