झुमका गिरा रे… कानातल्या झुमक्याने तिचा घात केला, थेट तुरूंगात रवानगी

महिलांना दागिन्यांची खूपच आवड असते. अशात एका घरातून लागोपाठ दागिने गायब होत होते. परंतू चोर काही सापडत नव्हता, व्हाट्सअपच्या डीपीमुळे चमत्कार घडला चोरीचा छडा लागला.

झुमका गिरा रे... कानातल्या झुमक्याने तिचा घात केला, थेट तुरूंगात रवानगी
jhumkas-for-womenImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:39 PM

मुंबई : मोबाईल फोनमुळे आपले जीवन व्यापले गेले आहे. त्यातच व्हाट्सअ‍ॅप आल्यानंतर मोबाईलचा वापर केवळ संभाषणापुरता राहीला नाही. व्हाट्सअ‍ॅपमुळे संदेशांची झटपट घेवाण देवाण करता येत आहे. आपले व्हाट्सअ‍ॅप डीपीचे फोटो सतत बदलणे, तसेच व्हाट्सअ‍ॅप स्टेटस सतत बदलत ठेवण्याचा छंद अनेक जणाला लागला आहे. परंतू हीच व्हाट्सअ‍ॅप डीपी बदलत राहण्याची सवय एका महिलेस चांगलीच गोत्यात आणणारी ठरली. व्हाट्सअ‍ॅपवर कानात झुमका घातलेला तिने डीपी ठेवला पण त्याच डीपीने तिचा घात केला आणि तिची थेट तुरुंगात रवानगी झाली.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील 50 लाख रूपयांचे दागिने आणि पाच लाखांची रोकड चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील दागिने गायब होत होते. परंतू चोर कोण आहे ? ते कळत नव्हतं..पोलीसांना काही केल्या चोरीचा छडा लागत नव्हता. अखेर घर मालकाच्या पत्नीला या चोरीचा छडा लागला. या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला या चोरी प्रकरणात अटक करण्यात आली. तिच्या चौकशीत पोलिसांनी तिला हिसका दाखवताच मोलकरणीने सर्व गुन्हा कबूल केला आहे.

भोपाळच्या टीटीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निशात कॉलनीत रहाणार डॉक्टर भूपेंद्र श्रीवास्तव याच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. भूपेंद्र यांचे शाहजहानाबाद ठाणा परिसरात खाजगी हॉस्पिटल आहे. भूपेंद्र यांच्या घरातील एक एक दागिने चोरीला जात होते. यांच्या घरी घर कामाला ठेवलेल्या महिलेचा व्हॉट्सअप क्रमांक डॉक्टरांच्या पत्नीकडे होता. त्यांच्या पत्नीने एकदा मोलकरणीचा व्हॉट्सअप वरील डीपी पाहीला असता. तिला धक्काच बसला. कारण त्यांची पत्नीकडे असलेले कानातील झुमके मोलकरणीच्या डीपीवरील फोटोत दिसले होते. त्यानंतर त्यांनी घरातील लॉकर तपासले असता त्यांच्या कानातील झुमके गायब झालेले होते.

मोलकरणीलाआठ हजार रुपये पगार

डॉक्टर भूपेंद्र श्रीवास्तव यांनी त्यांच्या मोलकरणीच्या विरोधात पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मोलकरणीची चौकशी केली असता तिच्याकडे पन्नास लाखाचे दागिने आणि कॅश सापडली. या मोलकरणीला ते आठ हजार रुपये पगार होते. परंतू मोलकरणीकडे एसी आणि इतर सुविधा होत्या. त्यामुळे त्यांना संशय होतात. परंतू डीपीवरील फोटोमुळे मोलकरणीचा डाव उघडकीस आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.