Terrible:बापानेच पोराची हत्या करुन लोखंड कापण्याच्या ग्राईंडरने शरीराचे छोटे छोटे तुकडे केले आणि… भयानक हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले

गुजरातमधील अहमदाबाद येथील वसना परिसरात या मृत मुलाच्या शरीराचे तुकडे सापडले होते. डोके, हात आणि पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेच्या 5 दिवसांनंतर वसनापासून 3 किमी अंतरावरील एलिसब्रिज परिसरातून तुटलेले पाय देखील पोलिसांना सापडले. या घटनेबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. 

Terrible:बापानेच पोराची हत्या करुन लोखंड कापण्याच्या ग्राईंडरने शरीराचे छोटे छोटे तुकडे केले आणि... भयानक हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 5:49 PM

अहमदाबाद : कोणतेही आई-बाप आपल्या लेकराला तळहातातल्या फोडाप्रमाणे जपत असतात. स्वतः अतोनात कष्ट घेऊन आपल्या मुलाला काही कमी पडणार नाही त्यासाठी आई-बाप झटत असतात. मात्र, एका पित्याने आपल्या मुलाची निघृण पणे हत्या(Murder) केल्याची धक्कादायक घटना गुजरात(Gujrat) मध्ये घडली आहे. एका पित्याने स्वतःच्या मुलाची हत्या करून ग्राइंडरने त्याच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले आहेत. यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत भरुन अनेक ठिकाणी त्याने हे मृतदेहाचे तुकडे फेकले होते. या भयानक हत्याकांडाचा तपास करताना पोलीसही चक्रावले. पित्याने मुलाची हत्या करण्यामागचे धक्कादायक कारण पोलीस तपासा दरम्यान समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील वसना परिसरात या मृत मुलाच्या शरीराचे तुकडे सापडले होते. डोके, हात आणि पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेच्या 5 दिवसांनंतर वसनापासून 3 किमी अंतरावरील एलिसब्रिज परिसरातून तुटलेले पाय देखील पोलिसांना सापडले. या घटनेबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

आरोपी पिता हा रिटायर्ड अधिकारी आहे

हितेश असे मृत तरुणाचे नाव आहे. २१ वर्षीय हितेशच्या वृद्ध वडिलांनीच त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले. आरोपी पित्याने ग्राइंडरने मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर कचऱ्याच्या काळ्या पॉलिथिनमध्ये हे शरीराचे तुकडे भरुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. 22 जुलै रोजी अहमदाबादमध्ये हात, पाय आणि डोके कापलेले मृतदेह पोलिसांना सापडला होता. तरुणाची हत्या त्याच्या वडिलांनीच केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला दारू आणि ड्रग्जचे व्यसन होते. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी पिता हा रिटायर्ड अधिकारी आहे.

मुलाला दारूचे व्यसन होते

आरोपीने पोलिसांना सांगितले की, गेल्या 5-6 वर्षांपासून त्याचा मुलगा दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होताय हत्येच्या दिवशी देखील तो दारू पिऊन पैशाची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर वडिलांनी दगडाने त्याच्या डोक्यात वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.

ग्राइंडर मशीनने शरीराचे तुकडे केले

मुलाच्या मृत्यूनंतर आरोपी वडील अहमदाबादच्या कालुपूर मार्केटमध्ये गेले, तेथून ग्राइंडर मशीन आणले. यानंतर त्यांनी मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे कचऱ्याच्या काळ्या पॉलिथिनमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.

मुलाच्या हत्येनंतर आरोपी वडील सुरतला गेले

अहमदाबाद क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या हत्येनंतर आरोपी वडील सुरतला गेले होते. सुरतहून गोरखपूरला अवध एक्स्प्रेसने जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अटक करण्यात आली. गोरखपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर आरोपींना तेथून नेपाळला पळून जायच्या प्रयत्नात होता.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....