Ulhasnagar Pole Collapse : उल्हासनगरात विद्यार्थिनीच्या डोक्यावर विजेचा खांब कोसळला, दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी
उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी परिसरात बुधवारी सकाळी एक भलंमोठं झाड कोसळल्याची घटना घडली होती. हे झाड विजेच्या तारांवर सुद्धा पडल्याने विजेच्या खांबावर ताण पडून हा खांब वाकला होता.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका शाळकरी विद्यार्थिनी (Student)च्या डोक्यात विजेचा खांब (Electricity Poll) कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सदर विद्यार्थिनी गंभीर जखमी (Injured) झाली असून तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निशा गुप्ता असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठं झाड कोसळलं. हे झाड विजेच्या तारांवरही कोसळल्याने खांबावर ताण पडून तो वाकला होता. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. काही वेळाने याच रस्त्यावरुन ही विद्यार्थिनी जात असताना तिच्या डोक्यावर तो खांब पडला. यात विद्यार्थिनीच्या डोक्याला अंतर्गत इजा झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना
उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी परिसरात बुधवारी सकाळी एक भलंमोठं झाड कोसळल्याची घटना घडली होती. हे झाड विजेच्या तारांवर सुद्धा पडल्याने विजेच्या खांबावर ताण पडून हा खांब वाकला होता. याबाबत स्थानिकांनी महावितरणकडे तक्रारही केली होती. मात्र महावितरण कर्मचारी वेळेत आले नाहीत, अशी इथल्या स्थानिकांची तक्रार आहे. काही वेळाने याच भागातून निशा गुप्ता नावाची दहावीत शिकणारी विद्यार्थिनी जात होती. याचवेळी हा खांब कोसळला आणि थेट विद्यार्थिनीच्या डोक्यात पडला. त्यामुळे ही विद्यार्थिनी जागीच बेशुद्ध पडली. स्थानिकांनी तिला तातडीने उचलून खासगी रुग्णालयात दाखल केलं. या विद्यार्थिनीच्या डोक्याला अंतर्गत इजा झाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (The girl was seriously injured when a power pole fell on her head in Ulhasnagar)