भंडारा बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरण, सात आरोपींचा गुन्हा सिद्ध; न्यायालय काय शिक्षा देणार?

भंडाऱ्यात प्रतिष्ठीत सराफा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकत चोरट्यांनी घरातील तिघांची हत्या करत सोने लुटले होते. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होती.

भंडारा बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरण, सात आरोपींचा गुन्हा सिद्ध; न्यायालय काय शिक्षा देणार?
सोनी हत्याकांड प्रकरणाची सुनावणीपूर्णImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 6:38 PM

भंडारा / तेजस मोहतुरे : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची अंतिम सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून, सातही आरोपींना उद्या शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. सातही आरोपींना मुख्य न्यायाधीश उद्या कोणती शिक्षा सुनावतील याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ माजली होती.

2014 मध्ये घडले होते सोनी हत्याकांड

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल या तिघांचा 26 फेब्रुवारी 2014 मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून 8.3 किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख असा साडेतीन कोटींचा ऐवज पळवला होता. त्यानंतर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसर येथून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी 800 पानांचे आरोपपत्र केले होते सादर

या हत्याकांडात बचावलेल्या संजय सोनी यांच्या मुलीने अ‍ॅड.निकम यांची भेट घेऊन आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या हत्याकांड प्रकरणी 800 पानांचे आरोपपत्र सोनी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले होते. या पुराव्याच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाला असून, उद्या न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.